व्हॅल्युअर्सना भविष्यात चांगले दिवस : बी. कनगा सबापत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:17 PM2020-02-27T16:17:46+5:302020-02-27T16:19:34+5:30
सध्याच्या बदलत्या युगात ‘व्हॅल्युएशन’ची गरज पदोपदी जाणवत असल्याने व्हॅल्युएशन विषयाला भविष्यात चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन व्हॅल्युएशन तज्ज्ञ बी. कनगा सबापत्ती यांनी केले.
कोल्हापूर : सध्याच्या बदलत्या युगात ‘व्हॅल्युएशन’ची गरज पदोपदी जाणवत असल्याने व्हॅल्युएशन विषयाला भविष्यात चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन व्हॅल्युएशन तज्ज्ञ बी. कनगा सबापत्ती यांनी केले.
असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅड इंजिनिअर्सच्या वतीने बुधवारी ‘पर्पज अॅँड मेथड्स आॅफ व्हॅल्युएशन’ या विषयावर ते बोलत होते. कोल्हापूरसह इचलकरंजी, गडहिंग्लज, सांगली, सातारा येथील आर्किटेक्टस व इंजिनिअर्स यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
बी. कनगा सबापत्ती म्हणाले, व्हॅल्युएशन ही काळाची गरज ठरत असल्याने भविष्यात व्हॅल्युअरना चांगले दिवस येतील. कोणत्या कामांसाठी व्हॅल्युएशन हवे आहे, यावरून कोणती सर्वोत्तम पद्धत अवलंबायची आणि कोणत्या प्रकारच्या किमतीचा निकष लावायचा हे निश्चित करावे लागते.
दैनंदिन व्यवहारात जरुरी असलेल्या व्हॅल्युएशनपैकी २४ प्रकारचे व्हॅल्युएशन फक्त बँकांमध्ये आवश्यक असते. इन्कम टॅक्स, लिलाव, वित्तीय संस्थांची कर्जप्रकरणे, व्हिसा, लिक्विडेशन, इन्शुरन्स या सर्वांचा विचार करता भविष्यात व्हॅल्युअर म्हणून काम करणाऱ्या आर्किटेक्टस व इंजिनिअर्स यांना महत्त्व प्राप्त होणार आहे.
प्रास्ताविकात असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस व इंजिनिअर्स या संस्थेच्या वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा घेतला. राज डोंगळे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.
यावेळी उमेश कुंभार, सुधीर राऊत, जयंत बेगामपुरे, प्रमोद पोवार, विजय पाटील, निशांत पाटील, उदय निचिते, संदीप घाटगे, महेश यादव, जीवन बोडके, अनिल निकम, बाजीराव भोसले, मोहन वायचळ, बलराम महाजन, आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सभासद प्रमोद चौगुले, गौरी चोरगे, प्रशांत काटे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.