युती तुटल्याने आघाडीला ‘अच्छे दिन’

By admin | Published: January 31, 2017 12:04 AM2017-01-31T00:04:49+5:302017-01-31T00:04:49+5:30

शिरोळ तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार : जि. प., पं. स. निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

'Good days' to lead alliance | युती तुटल्याने आघाडीला ‘अच्छे दिन’

युती तुटल्याने आघाडीला ‘अच्छे दिन’

Next



संदीप बावचे ल्ल जयसिंगपूर
शिवसेना-भाजप युती तुटल्याने शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे सध्या तरी बदलली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. युतीकडून इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक धर्तीवर काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप पक्षाच्या स्वतंत्र मुलाखती झाल्या, तर ‘स्वाभिमानी’ने एकला चलोरे अशी भूमिका घेत प्रचार मोहीम राबविली. त्यामध्ये मोठ्या उत्साहाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले होते. स्वबळाचा नारा या पक्षांनी सुरुवातीला घेतला असला तरी सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुहेरी चाल करत काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपबरोबर बैठका घेतल्या. जागा वाटपावरून स्वाभिमानी तळ्यात-मळ्यात असली तरी भाजपसोबतच तालुक्यात त्यांचा सूर जमणार असे संकेत आहेत.
शिरोळ तालुक्यात बहुजन विकास आघाडीतील मातब्बर नेते भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेनेतील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते. हे दोन्ही पक्ष जि. प. व पं. स. निवडणुकीत एकत्र लढतील असे चित्र असताना शिवसेनेने वरूनच युती न करण्याचे जाहीर केल्याने आता शिवसेना व भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजप व सेनेकडून जागा पदरात पाडून घेण्यासाठी व उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अजूनही युती होईल या अपेक्षेत काही कार्यकर्ते आहेत. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये उमेदवारांचा हिरमोड झाला असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन्ही पक्षांची आघाडी झाली व आपल्याला उमेदवारी मिळाली तर सदस्य होण्याची संधी आहे या आनंदात कार्यकर्ते आहेत.
शिवसेना कुणासोबत
विधानसभेवेळी उल्हास पाटील यांना आमदार करण्यात बहुजन विकास आघाडीतील नेत्यांचा प्रमुख वाटा होता. याच बहुजन आघाडीतील नेते आता भाजपात गेले आहेत.
सुरुवातीला भाजप-शिवसेना युती करून लढण्याचे संकेत होते. मात्र, ही युती मुंबईतून तुटल्यामुळे
आमदार उल्हास पाटील यांना पक्षाचा आदेश पाळावा लागणार आहे.
त्यांची भूमिका या निवडणुकीत काय असणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: 'Good days' to lead alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.