गुड न्यूज : वेतनासह सर्व मिळकत ब्रम्हाकुमारीच्या ईश्वरीय कार्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:59+5:302021-01-01T04:16:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वेगळा विचार सोबत घेऊन काम करणाऱ्यांमुळे समाजामध्ये विधायकतेचा जागर सुरू असतो हे वास्तव आहे. ...

Good news: All income including salary for Brahmakumari's divine work | गुड न्यूज : वेतनासह सर्व मिळकत ब्रम्हाकुमारीच्या ईश्वरीय कार्यासाठी

गुड न्यूज : वेतनासह सर्व मिळकत ब्रम्हाकुमारीच्या ईश्वरीय कार्यासाठी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वेगळा विचार सोबत घेऊन काम करणाऱ्यांमुळे समाजामध्ये विधायकतेचा जागर सुरू असतो हे वास्तव आहे. अशाच पद्धतीने आजरा येथे ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून संध्या बहेनजी आणि उत्तम भाई सहकाऱ्यांसह कार्यरत आहेत. शिक्षकीपेशातील या दोघांनीही घरदार सोडलेच, परंतु आतापर्यंतचे सर्व वेतन आणि निवृत्तीनंतरचाही सर्व निधी याच कार्यासाठी समर्पित केला आहे.

संध्या पोतदार आजऱ्याच्याच. एम.एस्सी.बी.एड्‌. आजरा हायस्कूलच्या विज्ञान शिकविणाऱ्या या शिक्षिकेला ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या कार्याने आकर्षित केेले. आजऱ्यामध्ये प्रभाकर पाचवडेकर यांनी १९८२ पासून या कार्याला सुरुवात केली तेव्हापासूनच संध्या यांनी समर्पित जीवन जगण्याचा निर्णय घेतला. घर सोडले आणि पूर्णवेळ त्या ब्रम्हाकुमारीचे कार्य करू लागल्या तेव्हापासून निवृत्त होईपर्यंत नंतरचा सर्व मिळालेला पैसा त्यांनी आजऱ्यातील केंद्राच्या इमारतीसाठी खर्च केला. संस्थेचे चारचाकी वाहन आहे. त्यातून हजारोजण माऊंट आबूला जाऊन आले आहेत.

संध्या बहेनजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे अन्य एक सहकारी म्हणजे उत्तमभाई. हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावचे. आजरा तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस आले. त्यांनाही ही जीवनपद्धती आवडली आणि त्यांनीही समर्पित जीवनाला सुरुवात केली. सर्व मिळकत या कार्यासाठी त्यांनी खर्च केली आहे. या कार्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आजही आजरा येथील ब्रम्हाकुमारी केंद्राचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. अशाच योगदान देणाऱ्या व्यक्तिंमुळे समाजातील विधायकता वाढण्यास मदत होत असते यात शंका नाही.

चौकट

व्याप वाढविला

या दोघांनी १२ बहेनजी आणि अन्य भाईंच्या सहकार्याने उत्तूर, नेसरी, कोवाड, चंदगड येथेही केंद्रे सुरू केली. त्यातील बहुतांशी ठिकाणी जागा घेऊन इमारती बांधण्याचे नियोजन आहे. समाजातील अनेक दानशूरांनी त्यांना पाठबळ दिले आहे.

चौकट

हे सुरू आहे कार्य

व्यसनमुक्तीपासून ते सेंद्रीय शेतीपर्यंत सर्व विषयांवर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी विविध शिबिरे, कार्यक्रम, कार्यशाळा घेतल्या जातात. तणावमुक्तीसाठी तर खास शिबिरे घेतली जातात. सकारात्मक जीवन जगण्याची कला येथे शिकविली जाते. आजऱ्यातील ४० नागरिक रोज केंद्रावर ध्यानधारणेसाठी येतात. व्यसनमुक्त झालेले अनेकजण या संस्थेला सहकार्य करतात.

३११२२०२० कोल संध्या बहेनजी

३११२२०२० कोल उत्तमभाई

३११२२०२० कोल आजरा ०१

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे उभारण्यात आलेली ब्रम्हाकुमारी केंद्राची इमारत.

Web Title: Good news: All income including salary for Brahmakumari's divine work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.