गूड न्यूज : तीन आठवड्यांत पॉझिटिव्हिटी रेट ३.९१ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:30+5:302021-07-08T04:17:30+5:30

कोल्हापूर : मागील तीन आठवड्यांच्या कोरोना चाचण्या आणि पॉझिटिव्ह आलेले रुग्ण याचे तुलनात्मक प्रमाण पाहता पॉझिटिव्हिटी ...

GOOD NEWS: The positivity rate declined by 3.91 per cent in three weeks | गूड न्यूज : तीन आठवड्यांत पॉझिटिव्हिटी रेट ३.९१ टक्क्यांनी घटला

गूड न्यूज : तीन आठवड्यांत पॉझिटिव्हिटी रेट ३.९१ टक्क्यांनी घटला

Next

कोल्हापूर : मागील तीन आठवड्यांच्या कोरोना चाचण्या आणि पॉझिटिव्ह आलेले रुग्ण याचे तुलनात्मक प्रमाण पाहता पॉझिटिव्हिटी रेट हा ३.९१ टक्क्यांनी कमी झाला. ही कोरोनाची साथ ओसरण्याची लक्षणे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू केल्याने ज्यांच्याकडून कोविडचा प्रसार झाला असता, तो रोखण्यात यश येत असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता चाचण्या करून घ्याव्यात. दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोविड साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी दैनंदिन सर्वेक्षण करून रॅपिड ॲन्टिजन व आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात गावपातळीवर नियोजन केले असून, विविध पातळ्यांवर आढावा घेऊन रुग्णशोध व तपासणी कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

चौकट

पॉझिटिव्हिटी दर गेला २० टक्क्यांवर

कोविडच्या दुसऱ्या साथीमध्ये १ एप्रिल २०२१ ते ७ एप्रिल २०२१ या आठवड्यामध्ये एकूण केलेल्या चाचण्यांची संख्या १२ हजार २७ होती, तर रुग्णसंख्या १ हजार २५८ होती. ह्या आठवड्याचा रुग्ण पॉझिटिव्हिटी दर १०.४६ टक्के होता. आठवड्यामध्ये ४५ रुग्णांचे मृत्यू झाले होते. प्रतिलाख लोकसंख्येमध्ये ३ हजार १०८ इतक्या रुग्णांची तपासणी करण्यात येत होती. २९ एप्रिल २०२१ ते ५ मे २०२१ या आठवड्यामध्ये एकूण केलेल्या चाचण्यांची संख्या ४४ हजार २५१ होती तर, रुग्णसंख्या ९ हजार ८४ होती. ह्या आठवड्याचा रुग्ण पॉझिटिव्हिटी दर २०.५३ इतका सर्वाधिक होता. आठवड्यामध्ये २७७ रुग्णांचे मृत्यू झाले होते.

चौकट

पुन्हा पॉझिटिव्हिटी रेट आला ७.१८ टक्क्यांवर

२७ मे २०२१ ते २ जून २०२१ या आठवड्यामध्ये एकूण चाचण्यांची संख्या ६८ हजार २३१ होती. तर रुग्णसंख्या ११ हजार ९२१ होती. ह्या आठवड्याचा रुग्ण पॉझिटिव्हिटी दर १७.४७ इतका होता. आठवड्यामध्ये २६६ रुग्णांचे मृत्यू झाले होते. प्रतिलाख लोकसंख्ये त्यावेळी १७ हजार ६२१ इतक्या रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. १७ जून २०२१ ते २३ जून २०२१ या आठवड्यामध्ये एकूण केलेल्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. ह्या आठवड्यामध्ये ही संख्या १ लाख १८ हजार ५२१ होती, तर रुग्णसंख्या ८ हजार ५१२ होती. ह्या आठवड्याचा रुग्ण पॉझिटिव्हिटी दर ७.१८ टक्के इतका खाली आला होता. आठवड्यामध्ये २३७ रुग्णांचे मृत्यू झाले होते.

२४ जून २०२१ ते ३० जून २०२१ या आठवड्यामध्ये एकूण केलेल्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यात आली होती. ह्या आठवड्यामध्ये ही संख्या १ लाख ३० हजार २०६ होती, तर रुग्णसंख्या ११ हजार ४५० होती. ह्या आठवड्याचा रुग्ण पॉझिटिव्हिटी दर ८.७९ इतका खाली आला होता. आठवड्यामध्ये २२७ रुग्णांचे मृत्यू झाले होते. जुलै २०२१ च्या पहिल्या आठवड्यामध्ये एकूण केलेल्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. ह्या आठवड्यामध्ये ही संख्या ९१ हजार २५९ होती, तर रुग्णसंख्या ९ हजार ८१० होती. ह्या आठवड्याचा रुग्ण पॉझिटिव्हिटी दर १०.७५ इतका खाली आला होता. आठवड्यामध्ये १७१ रुग्णांचे मृत्यू झाले होते.

चौकट

गेल्या तीन आठवड्यांतील तुलनात्मक माहिती

आठवडा एकूण तपासण्या बाधित रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

पहिला आठवडा २६,४६२ ४,१७९ १५.७९ टक्के

दुसरा आठवडा ३८,८४५ ५,४६२ १४.०६ टक्के

तिसरा आठवडा ६०,९५० ७,२३९ ११.८८ टक्के

Web Title: GOOD NEWS: The positivity rate declined by 3.91 per cent in three weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.