पॅरोलवरील कैद्यांसाठी गुड न्यूज, सुट्टीत महिन्याची वाढ : शरद शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:31 AM2020-06-25T11:31:24+5:302020-06-25T11:33:05+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग अद्याप नियंत्रणात न आल्याने पॅरोलच्या सुट्टीवर गेलेल्या कैद्यांच्या सुट्टीत आणखी महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

Good news for prisoners on parole, increase in vacation month: Sharad Shelke | पॅरोलवरील कैद्यांसाठी गुड न्यूज, सुट्टीत महिन्याची वाढ : शरद शेळके

पॅरोलवरील कैद्यांसाठी गुड न्यूज, सुट्टीत महिन्याची वाढ : शरद शेळके

Next
ठळक मुद्देपॅरोलवरील कैद्यांसाठी गुड न्यूज, सुट्टीत महिन्याची वाढ : शरद शेळकेकारागृहाकडून कैद्यांना, पोलीस ठाण्यांना पाठवली पत्रे

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग अद्याप नियंत्रणात न आल्याने पॅरोलच्या सुट्टीवर गेलेल्या कैद्यांच्या सुट्टीत आणखी महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कारागृहांमध्ये सात वर्षांच्या आतील शिक्षा भोगणाऱ्या आणि कच्च्या कैद्यांना ४५ दिवसांच्या पॅरोलवर सुट्टी दिली आहे; पण कोरोनाचा संसर्ग अजूनही नियंत्रणात आलेला नाही, तोपर्यंत दिलेली ४५ दिवसांची सुट्टी संपत आली आहे. त्यामुळे सरकारने पॅरोल मंजूर केलेल्या कैद्यांची सुट्टी आणखी एक महिन्याने वाढवली. दरम्यान, कोल्हापुरात कळंबा कारागृहातील ४०० कैदी पॅरोलमुळे सुटले आहेत.

कारागृहांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी कच्चे कैदी आणि सात वर्षांच्या आतील शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानुसार राज्यातील ६० कारागृहांपैकी ४५ कारागृहांमधील नऊ हजार कैद्यांना पॅरोल मंजूर झाला होता.

राज्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही नियंत्रणात आला नसल्याने कैद्यांच्या पॅरोलमध्ये आणखी एक महिन्याची वाढ केली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

कळंबातील ४०० कैद्यांना लाभ

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ४०० कैद्यांना पॅरोल मंजूर झाला आहे. त्यांना या वाढीव सुट्टीचा लाभ मिळणार आहे. कारागृहात सध्या २०१८ कैदी असून, आयटीआय कॉलेज येथील आपत्कालीन कारागृहात २२ कैदी ठेवले आहेत.

Web Title: Good news for prisoners on parole, increase in vacation month: Sharad Shelke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.