(गुड न्यूज) : शिवाजी विद्यापीठाकडून ३० प्राध्यापकांना पदोन्नतीव्दारे ‘नववर्षाची भेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:37+5:302021-01-02T04:19:37+5:30
चौकट नववर्षात पदोन्नतीचे वेळापत्रक ठरविणार दिवाळीपूर्वी ‘कॅस’अंतर्गत ३६ प्राध्यापकांना पदोन्नती दिली होती. आता नववर्षाच्या पहिल्यादिवशी ३० जणांना दिली जाणार ...
चौकट
नववर्षात पदोन्नतीचे वेळापत्रक ठरविणार
दिवाळीपूर्वी ‘कॅस’अंतर्गत ३६ प्राध्यापकांना पदोन्नती दिली होती. आता नववर्षाच्या पहिल्यादिवशी ३० जणांना दिली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. सर्व पात्र प्राध्यापकांना त्यांच्या करिअरच्यादृष्टीने पदोन्नती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. पदोन्नतीमुळे काम करण्यातील हुरूप वाढतो. ज्या-त्या वर्षी पदोन्नती मिळणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे वेळापत्रक नववर्षात विद्यापीठ प्रशासनाकडून ठरविण्यात येईल. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
चौकट
पदोन्नतीची प्रक्रिया
सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांना पुढे सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक अशी पदोन्नती ‘कॅस’ अंतर्गत दिली जाते. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता, अर्हता पूर्ण केलेल्या प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे अर्ज करणे आवश्यक असते. अर्ज केल्यानंतर प्रशासनाकडून त्याची छाननी केली जाते. त्यानंतर काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करून, काही प्रकरणांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नती देण्याची कार्यवाही होते.