ग्रामीण विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:23+5:302021-03-16T04:24:23+5:30
शिरोळ : गतवर्षी कोरोनाच्या महामारीमुळे राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सामान्यांपासून सर्वच क्षेत्रातील घटकांचे अर्थशास्त्र बिघडले आणि त्याचा ...
शिरोळ : गतवर्षी कोरोनाच्या महामारीमुळे राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सामान्यांपासून सर्वच क्षेत्रातील घटकांचे अर्थशास्त्र बिघडले आणि त्याचा परिणाम राज्याच्या आर्थिक उत्पन्नावर झाला. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ग्राम विकासाला चालना मिळण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे, असा दावा आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला.
शिरोळ तालुक्यातील घालवाड, कनवाड व कुटवाड या तीन गावांमध्ये राज्यमंत्री यड्रावकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ८७ लाखांच्या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंजूर निधीमधून या गावांमध्ये अंतर्गत रस्ते, सांस्कृतिक सभागृह, पेव्हिंग ब्लॉक, हायमॅक्स दिवे, ओपन जिम उभारण्याची कामे केली जाणार आहेत. घालवाड येथे इंद्रजित सरनोबत, गिरीश कंदले, प्रेमचंद फडतारे, भाऊसाहेब खोंद्रे, प्रताप नाईक, कुटवाड येथे वत्सला पाटील, विजय पाटील, संदीप कोळी, प्रशांत पाटील, अभिजीत पाटील तर कनवाड येथे सरपंच बाबासाहेब आरसगोंडा, बाळासाहेब कुपाडे, अखिलआली इनामदार, अनिल शहापुरे, शहाजान इनामदार, तायगोंडा पाटील, आसिफ पाथरवट, आण्णापा नरगच्चे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १५०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कनवाड (ता. शिरोळ) येथे राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.