दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वस्तूंना चांगला प्रतिसाद, जिल्हा परिषदेत प्रदर्शन व विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 06:39 PM2020-11-09T18:39:23+5:302020-11-09T18:41:21+5:30
diyang, zp, kolhapur, school, diwali कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सोमवारी वेगळीच लगबग सुरू होती. दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्री सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि आलेल्या नागरिकांनी वस्तूंची खरेदी करत या विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला दाद दिली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सोमवारी वेगळीच लगबग सुरू होती. दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्री सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि आलेल्या नागरिकांनी वस्तूंची खरेदी करत या विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला दाद दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणबत्या, आकाश कंदील, भेटवस्तू तयार केल्या आहेत. या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. उद्घाटनावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सदानंद बगाडे, सुहास कुरूकले, मुख्याध्यापक कृष्णात चौगुले, उज्ज्वला खेबुडकर, स्मिता रणदिवे, चंद्रकांत शेटे, प्रमोद भिसे, तृप्ती गायकवाड, ईश्वरी शेडबाळे आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात स्वयंम उद्योग केंद्र, सन्मती मतिमंद विकास केंद्र व व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, बौद्धिक अक्षम मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, कागल, बौद्धिक अक्षम मुलांची शाळा व कार्यशाळा जिज्ञासा राही, कर्णबधिर विद्यालय पेठवडगाव, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल तिळवणी यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.