गुड टच आणि बॅड टच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:57 AM2018-04-24T00:57:40+5:302018-04-24T00:57:40+5:30

Good Touch and Bad Touch | गुड टच आणि बॅड टच

गुड टच आणि बॅड टच

googlenewsNext

सध्या समाज माध्यमांमध्ये गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय, हे सांगणाऱ्या ध्वनिचित्रफिती फिरत आहेत. ज्या लहान मुलांना एखाद्या व्यक्तीचा स्पर्श कसा ओळखावा हे शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला कारणही तसेच आहे. देशभरात बलात्काराच्या विशेषत: बालिकांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या कथुआ, उन्नाव आणि सुरत येथील बालिकांवरील बलात्काराच्या घटना तर कुणाचेही मन पेटून उठविणाºया आहेत. चीड आणणाºया आहेत. अजाण बालिका ज्यांनी जगही नीट पाहिलेले नसते. चांगले, वाईट हे कळण्याजोगे त्यांचे वयही नसते. अशा मुलींवर बलात्कार करणारे विकृतच असले पाहिजेत. बलात्काराच्या या घटनांमुळे देशभर जनक्षोभ उसळला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही एका याचिकेवरील सुनावणीच्यावेळी देशाची प्रतिमा बलात्काराची होत असल्याची टिप्पणी केली आहे. वाढता जनक्षोभ आणि न्यायालयाचे मत पाहून मोदी सरकारने अखेर कायदा कठोर करण्याचा निर्णय घेऊन तसा अध्यादेशही जारी केला आहे. सुधारित पॉस्को कायद्यानुसार आता १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाºयाला फाशी, १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाºयाला आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा आणि महिलेवरील बलात्कारप्रकरणी होणारी शिक्षा ७ ऐवजी १० वर्षांचा कारावास अशी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बलात्काराची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालविली जाणार आहेत. तसेच ती दोन महिन्यांत निकालात काढली जाणार आहेत. कायद्यातील या सुधारणांमुळे लैंगिक अत्याचार करणाºयांना जरब बसेल आणि अशा घटना कमी होतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. तशी ती आपण निर्भया प्रकरणानंतर करण्यात आलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को) करण्यात आला त्यावेळीही बाळगलीच होती. हा कायदा झाल्यानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले. फाशीच्या शिक्षाही काही प्रकरणात न्यायालयांनी ठोठावल्या. हे खरे असले तरी यामुळे बलात्काराच्या घटना कमी झाल्याचे काही दिसले नाही. २०१४ मध्ये ३४ हजार ४४९ बलात्काराची प्रकरणे पोलिसांत दाखल झाली. याप्रकरणी ४१ हजार ४७२ जणांना अटक करण्यात आली, तर बलात्कारप्रकरणी २६८६ जण दोषी ठरले. २०१५ मध्ये हाच आकडा ३४ हजार ५०५ गुन्हे, ४१ हजार ९० जणांना अटक आणि ४५६७ जण दोषी असा होता. २०१६ मध्ये तो ३६ हजार २२ गुन्हे, ४२ हजार १६० जणांना अटक आणि ४०१३ जण दोषी असा होता. पोलिसांपर्यंत न गेलेली प्रकरणेही अनेक असतील. इस्लामी राष्टÑात बलात्काºयाला दगडाने ठेचून मारण्याची, शिरच्छेद करण्याची शिक्षा ठोठावली जाते. अशा शिक्षांची अंमलबजावणी केली जात असतानाच्या काही व्हिडिओ क्लिपही गेल्या काही दिवसांत व्हायरल झाल्या आहेत. त्या पाहिल्यानंतर असे गुन्हे करण्यास कोणीही धजावणार नाही असे वाटते. मात्र, आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे तशा पद्धतीची शिक्षा अमलात आणली जाईल असे वाटत नाही. तरीही असलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढले तरी गुन्हेगारांना जरब बसू शकेल. याचवेळी सुजाण पालक म्हणून आपण आपल्या लहान मुलींना चांगले, वाईट स्पर्श ओळखण्यास शिकविले पाहिजे. अशा गोष्टी लहान मुलांसमोर बोलल्या जात नाहीत. तशी आपली मानसिकता नाही हे खरे असले तरी ती बदलायला हवी. व्हायरल होणाºया ध्वनिचित्रफितीत बॅड टच म्हणजे काय हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरेतर महिलांमध्ये पुरुषी स्पर्श आणि नजर ओळखण्याची एक उपजत क्षमता असते असे म्हणतात. त्यामुळे त्या वेळीच सावध होतात; पण लहान मुलींना योग्य शिक्षण देणे आणि गुन्हेगारांना कठोर शासन देणे हाच यावरचा जालीम उपाय ठरू शकेल .
चंद्रकांत कित्तुरे

Web Title: Good Touch and Bad Touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.