शाबास; साताऱ्यानं गड राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 11:41 PM2017-03-03T23:41:09+5:302017-03-03T23:41:09+5:30
पवारांकडून कौतुक : भाजपच्या झंझावातातही सत्ता मिळविल्याबद्दल नेत्यांना शाबासकी
महेश आठल्ये -- म्हासुर्ली --आजच्या विज्ञान युगातही धामणी खोऱ्यातील मानबेट आणि चौके (ता. राधानगरी) या गावातील लोक पूर्वपरंपरेने चालत आलेली ‘गावपळण’ प्रथा मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे आजही पाळत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील रेषा यामुळे अंधूक बनली आहे. देवीच्या आदेशाने गावातील सर्व लोक, गुरे-ढोरे, कुत्री-मांजरी, कोंबड्या, पोराटारांसह तीन दिवस जंगलात झोपड्या बांधून राहत असून ही दोन्ही गावे ओस पडली आहेत. एकप्रकारे निसर्गाशी एकरूप होण्याचाच हा प्रकार
आहे. चौके आणि मानबेट ही दोन गावे म्हणजे धामणी खोऱ्याचे शेवटचे टोक. या दोन गावांमध्ये शेकडो वर्षांपासून दर तीन वर्षांनी इथले ग्रामस्थ गुरा-ढोरांसह आपला गाव सोडतात आणि तीन दिवस वेशीबाहेर जाऊन जंगलात नदीकाठी झोपड्या बांधून मुक्काम करतात. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली येथील प्रथा ग्रामस्थ मनोभावे पाळतात. मानबेट गावातील ग्रामदैवत रासाईदेवीचा दर तीन वर्षांनी आदेश येतो, असे मानले जाते. या तीन दिवसांत गावात पै-पाहुणाही फिरकत नाही. या तीन दिवसांत गावातील सर्व व्यवहार ठप्प तर होतातच शिवाय गावात चोरीही होत नाही. ही प्रथा न पाळणाऱ्यास, चोरी करणाऱ्यास देवी शिक्षा करते, असा ग्रामस्थांचा समज असून आजपर्यंत चोरीची एकही अशी घटना घडलेली नाही. या ‘गावपाळण’च्या तीन दिवसांत जंगलात एक नवा गावच तयार होतो. प्रत्येकजण आपणास हवी तशी झोपडी बांधतो. सर्वांचा मुक्काम या झोपड्यातच असतो. या काळात गावाकडे फिरकायचेच नाही, असा दंडक आहे. देवीच गावाची रक्षणकर्ती आहे, असा समज आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळासह वृद्ध व अंथरूणास खिळलेल्यांनाही यातून सूट नाही. जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव यावेळी पाळला जात नाही. विज्ञान युगातही आव्हान ठरणारी ही प्रथा केव्हा सुरू झाली ते मात्र कोणासही सांगता येत नाही. पूर्वज पाळत होते म्हणून आम्ही पाळतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, दर तीन वर्षांनी सर्व गावाला निसर्गाच्या सान्निध्यात एकत्र आणत एकोप्याची भावना वाढविणे, घरांची साफसफाई करणे, निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे आदी उद्देश यामागे असू शकतात.
शिवाय पूर्वीच्या काळी गावामध्ये येणाऱ्या देवी, प्लेग सारख्या साथी व त्यापासून बचाव करण्यासाठी गावपळणची प्रथा पडली असण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या युगात याची तुलना अंधश्रद्धेशीच केली जाते. या काळात नोकरी व कामधंद्यासाठी बाहेरगावी असणारे गावकरी गावाकडे येतात व निसर्गाच्या सान्निध्यात जुन्या आठवणींना उजाळा देतात. पुन्हा देवीच्या आदेशानेच घराकडे जायचे असल्याने देवीच्या कौलाकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. बाहेरील पै- पाहुणेही याचा आनंद घेण्यासाठी या नव्या गावात येत आहेत. या दोन गावांना लाभलेली ही परंपरा अंधश्रद्धेच्या भावनेने पाहू
नये, अशी येथील लोकांची अपेक्षा आहे.
गावे पडली ओस : गुराढोरांसह आबालवृद्धांची गावाबाहेर नवी वस्तीशाळाही भरते झाडाखाली
‘गावपळण’च्या काळात गावात एकही सरकारी अधिकारी येत नाही वा त्यास येण्यास मज्जाव केला जातो.
येथील शाळाही जंगलातील नवीन गावातील झाडाखाली भरवली जाते व ज्ञानार्जन केले जाते.
आता गावपळणीतही
शिरले राजकारण
‘गावपळण’ची प्रथाही राजकारणास अपवाद ठरली नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा काहीसा परिणाम यावर झाला असून चौके येथील ग्रामस्थांनी दोन ठिकाणी लांब अंतरावर झोपड्या उभारून गटबाजी दाखविल्याची चर्चा आहे.
मुक्काम झोपड्यांतच
तीन दिवसांत जंगलात एक नवा गावच तयार होतो. सर्वांचा मुक्काम या झोपड्यातच असतो.
एकोप्याची भावना वाढविणे, घरांची साफसफाई करणे, निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे असा उद्देश यामागे असू शकतो.