जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:10 AM2018-01-14T01:10:22+5:302018-01-14T01:11:10+5:30

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली

 Goodwill Rally for Junking Police | जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली़ महामानवांच्या शिकवणी अंगिकारण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे़ सध्याच्या डिजिटल युगात कॅशलेस न राहता कास्टलेस राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा डॉ़ नीता माने यांनी केले़.

सकाळी नगरपालिकेपासून रॅलीची मूक मोर्चाने सुरुवात झाली़. रॅलीसमोर ‘आम्ही सारे भारतीय’ बॅनर लावण्यात आला होता़ राधिका घोरपडे या युवतीच्या हातात तिरंगा ध्वज देण्यात आला होता़ जुनी भाजी मंडई, तेरावी गल्ली, शिरोळ-वाडी रोड, क्रांती चौक येथून नगरपरिषदेसमोर रॅलीची सांगता झाली़ राज्यात कोठेही काहीही अनुचित प्रकार घडला तरी शांतताप्रिय ओळख असणाºया जयसिंगपूर शहरात सामाजिक शांतता बिघडू नये म्हणून नागरिकांनी वेळोवेळी दक्षता घेतली आहे़ या रॅलीतून राष्ट्राभिमान जागृत होऊन शहराच्या एकीचा संदेश देशात जाणार आहे.

‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेल्या चार वर्षांत शहर बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़; परंतु कोरेगाव भीमाच्या घटनेने तो संकल्प खंडित झाला़ भविष्यात देशात अथवा राज्यात काहीही घडल्यास सर्वांनी एकत्र येऊन निषेध नोंदवून सामाजिक सलोखा बाळगूया आणि बंद न करण्याची परंपरा या पुढेही जोपासूया़ यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, शहरातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी काढण्यात आलेली सद्भावना रॅली ही अभिनंदनीय बाब आहे़ भविष्यात शहर बंद न ठेवता़, सर्वांनी एकत्र येऊन निषेधाची परंपरा जोपासावी़ त्यास पोलीस यंत्रणेचे सहकार्य मिळेल़

या रॅलीत उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक बजरंग खामकर, पराग पाटील, महेश कलकुटगी, राहुल बंडगर, शैलेश चौगुले, सर्जेराव पवार, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, प्रेमला मुरगुंडे, संगीता पाटील-चिंचवाडकर, अनुराधा आडके, फारूक पठाण, आदींसह नागरिक सहभागी झाले होते़

जयसिंगपुरात कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात यापुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली.

Web Title:  Goodwill Rally for Junking Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.