सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गोपेश दावडा कोल्हापूर विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 10:52 AM2021-02-02T10:52:53+5:302021-02-02T10:58:28+5:30
CA exam Kolhapur चार्टर्ड अकौंटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागात बापट कॅम्प येथील गोपेश विपीनकुमार दावडा याने ८०० पैकी ५०९ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. मोहिते पार्कमधील अपूर्वा अवधूत हर्डीकर हिने ४७६ गुणांसह द्वितीय, तर प्रतिभानगर येथील श्रृती सुरेशकुमार शाह हिने ४७० गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
कोल्हापूर : चार्टर्ड अकौंटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागात बापट कॅम्प येथील गोपेश विपीनकुमार दावडा याने ८०० पैकी ५०९ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. मोहिते पार्कमधील अपूर्वा अवधूत हर्डीकर हिने ४७६ गुणांसह द्वितीय, तर प्रतिभानगर येथील श्रृती सुरेशकुमार शाह हिने ४७० गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
कोरोनाच्या नियमांचे पालन करून नोव्हेंबर २०२० मध्ये ही परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातील १७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २८ जणांनी यश मिळवले. त्यातील गोपेश, अपूर्वा, श्रृती यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. प्रतीक श्रीपन्नावार याने चौथा, तर कावेरी मिसाळ हिने पाचवा क्रमांक मिळविला.
अन्य यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मोहित मिरजकर, संजीवनी खुबचंदानी, रिया सिंधी, कृष्णात पाटील, श्रद्धा वाठारकर, शीतल पाटील, आकाश बसंतानी, देशना दोशी, लकी खंडेलवाल, वीरेंद्र शाह, प्रणव कोडोलीकर, स्वप्निल भालेकर, तानाजी गडदे, मुकुल भिलले, निखिल देवणे, अपर्णा कालेकर, ओंकार लंबे, उत्कर्ष पागडे, नितीश वंदुरे-पाटील, बबन साबळे, सागर पाटील, मंगेश पारकर, देविका गांधी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ह्यआयसीएआयह्णच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष अनिल चिकोडी, उपाध्यक्ष तुषार आंतूरकर, सचिव सुशांत गुंडाळे, खजानिस चेतन ओसवाल, समिती सदस्य अमित शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूरचा चांगला निकाल
दरवर्षी साधारणत: २५ जण सीए होतात. कोरोनामुळे गेल्यावर्षी कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तरीही २८ जण यशस्वी झाले. त्यामुळे यंदा निकाल चांगला लागला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले असल्याचे चेतन ओसवाल यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमाच्या परीक्षेतील फौंडेशन, इंटर आणि फायनल या टप्प्यांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळविल्याचा खूप आनंद होत आहे. माझ्या यशात कुटुंबीय, शिक्षकांचे मोठे योगदान आहे.
-गोपेश दावडा
शिक्षक, कुटुंबीयांचे पाठबळ आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर या परीक्षेत मी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. पुढे कॉर्पोरेट क्षेत्रात मी नोकरी करणार आहे.
-अपूर्वा हर्डीकर