जागा मिळाली : चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचा मार्ग अखेर मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:34 AM2021-06-02T11:34:07+5:302021-06-02T11:38:18+5:30

corona virus Gadhinglaj Hospital Kolhapur : गेल्या आठ वर्षापासून रखडलेल्या बेळगांव-वेंगुर्ला राज्य महामार्गावरील चंदगड तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयासह ट्रामा केअर सेंटरचा मार्ग मोकळा झाला. पाटणे फाट्यानजीक हलकर्णी एमआयडीसीतील ४ एकर जागा या सेंटरसाठी मिळाली आहे. त्याठिकाणी उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा असणारे ७० खाटांचे सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येणार आहे.

Got a place: The way to Chandgad Trauma Care Center is finally clear | जागा मिळाली : चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचा मार्ग अखेर मोकळा

चंदगड तालुक्यातील पाटणे फाटानजीक येथील नियोजित रूग्णालयाच्या हलकर्णी एमआयडीसीतील जागेच्या पाहणीनंतर आमदार राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, डॉ. सुहास साने, तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजागा मिळाली : चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचा मार्ग अखेर मोकळाहलकर्णी एमआयडीसीत उभारणार ५०खाटांचा दवाखाना,२० बेडचे आयसीयु युनीट

राम मगदूम

गडहिंग्लज : गेल्या आठ वर्षापासून रखडलेल्या बेळगांव-वेंगुर्ला राज्य महामार्गावरील चंदगड तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयासह ट्रामा केअर सेंटरचा मार्ग मोकळा झाला. पाटणे फाट्यानजीक हलकर्णी एमआयडीसीतील ४ एकर जागा या सेंटरसाठी मिळाली आहे. त्याठिकाणी उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा असणारे ७० खाटांचे सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येणार आहे.

२०१३ मध्ये तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या प्रयत्नाने या सेंटरला मान्यता मिळाली. परंतु, त्यासाठी निवडलेल्या पाटणे पाट्यावरील या जागेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.

कर्नाटक आणि कोकणला जोडणाऱ्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. एखादा अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी सध्या बेळगाव-गडहिंग्लज आणावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अत्यवस्थ रूग्ण वाटेतच दगावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अत्यवस्थ रूग्णांना ह्यगोल्डन अवरह्णमध्ये उपचार मिळावेत म्हणूनच चंदगडच्या जनतेचा या सेंटरसाठी आग्रह होता.

चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे.हा दवाखाना डोंगरी व दुर्गम चंदगड तालुक्यातील जनतेला वरदान ठरणार आहे.

हॉस्पिटल लवकर उभारा...!

३ मार्च २०१७ रोजी हलकर्णी एमआयडीसीमधील १६ हजार चौरस मीटर जागा या सेंटरसाठी देण्याची तयारी औद्योगिक विकास महामंडळाने दाखवली होती. परंतु, त्यासाठी २५ लाख ३५ हजार रूपये भरावे लागणार होते. त्यासाठी शासनाकडून निधी मिळाला नाही. दरम्यान, सुधारित दरानुसार जागेसाठी तब्बल ४२ लाख रूपये भरावे लागणार होते. परंतु, जनतेच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या या सेंटरसाठी ही जागा विनाशुल्क किंवा नाममात्र १ रूपये दराने मिळावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती. त्याला खास बाब म्हणून मान्यता मिळाली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दवाखान्याच्या उभारणीसाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

लोकमतने उठविला होता आवाज

६ जुलै २०२० रोजीच्या अंकात पाटणे उपजिल्हा रूग्णालय निधीअभावी रखडले या मथळ्याखालील वृत्ताद्वारे लोकमतने याप्रश्नी आवाज उठविला होता. त्याची नोंद घेवून औद्योगिक विकास महामंडळाने नाममात्र दराने ही जागा या रूग्णालयासाठी उपलब्ध करून दिली.





 

 

 

Web Title: Got a place: The way to Chandgad Trauma Care Center is finally clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.