सैनिक कुटुंबीयांच्या कल्याणासाठी शासन सदैव कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:42+5:302020-12-29T04:24:42+5:30
कुुंभोज : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत आपल्या देशबांधवांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सन्मान ...
कुुंभोज : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत आपल्या देशबांधवांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सन्मान म्हणून राज्यातील आजी-माजी सैनिक तसेच विधवा सैनिक पत्नी यांचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय घेतला असून सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शासनाने आजी-माजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी यांचा घरफाळा माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याबद्दल कुंभोज (ता.हातकणंगले) येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने कागल येथील निवासस्थानी मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्रीपती कोळी, सुनील भोसले, संदेश भोसले यांच्या हस्ते कागल येथील निवासस्थानी मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुंभोजमधील माजी सैनिकांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन मंत्री मुश्रीफ यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश भोसले, सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष राजाराम तिवडे, आण्णासाहेब चौगुले, आदम तांबोळी, भानुदास वाघमोरे, पंकज डोणे, उत्तम खोत, उमेश शिंदे, सदाशिव डोणे, रंगराव कुंभार, उत्तम खोत, तारा डोणे, शकुंतला डोणे, ललिता माळी, रेखा चौगुले, बिबी हिंगलजे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी-सैनिकांच्या कुटुंबीयांचा घरफाळा माफ केल्याबद्दल कुंभोज (ता. हातकणंगले) येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार माजी सैनिक श्रीपती कोळी, सुनील भोसले, संदेश भोसले आदींनी केला.