‘आयजीएम’साठी शासनाकडून १८.२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:09+5:302020-12-31T04:26:09+5:30

इचलकरंजीत आनंदोत्सव (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयाची इमारत व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी निवासस्थान दुरूस्तीसाठी आमदार प्रकाश ...

Government approves Rs 18.27 crore for IGM | ‘आयजीएम’साठी शासनाकडून १८.२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

‘आयजीएम’साठी शासनाकडून १८.२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Next

इचलकरंजीत आनंदोत्सव

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयाची इमारत व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी निवासस्थान दुरूस्तीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासनाकडून १८.२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या पार्श्वभूमीवर ताराराणी पक्षाने बुधवारी के. एल. मलाबादे चौकात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

आयजीएम रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याने चार वर्षांपूर्वी हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले. खासगी रुग्णालयातील सेवा सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने येथे योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आयजीएम रुग्णालयाकरिता १८.२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने पक्षाच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, बाबासाहेब पाटील, महावीर केटकाळे, जेवरबानू दुंडगे, सुवर्णा लाड, विजय पाटील, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(फोटो ओळी)

३०१२२०२०-आयसीएच-१३

इचलकरंजीत ताराराणी पक्षाने बुधवारी के. एल. मलाबादे चौकात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Web Title: Government approves Rs 18.27 crore for IGM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.