दिव्यांग मतदारांना शासकीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:13 AM2019-04-11T00:13:52+5:302019-04-11T00:13:56+5:30

कोल्हापूर : लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य मतदारांना जसा मतदानाचा हक्कबजावता येतो, तसाच दिव्यांग मतदारांनाही मतदानाचा हक्कबजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाने ...

Government assistance for Divya Voters | दिव्यांग मतदारांना शासकीय मदत

दिव्यांग मतदारांना शासकीय मदत

Next

कोल्हापूर : लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य मतदारांना जसा मतदानाचा हक्कबजावता येतो, तसाच दिव्यांग मतदारांनाही मतदानाचा हक्कबजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाने निर्देश दिले असून, त्याकरिता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर दिव्यांग मतदारांच्या मतदानावेळी कोणतीही कसूर राहू नये म्हणून अत्यंत बारकाईने नियोजन करण्यात येत आहे.
कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण अशा दोन विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांच्या याद्या निश्चित झाल्या असून, त्यांची घरपती जाऊन खात्रीदेखील करून घेण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये २३७, तर कोल्हापूर दक्षिणमध्ये १७६८ दिव्यांग मतदार आहेत. त्यांच्या मतदानाकरिता सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही तयार यादी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तीकरिता एक अ‍ॅप तयार केले आहे. तसेच क्रमांक १९५० हा टोल फ्री फोनही उपलब्ध करून दिला आहे. त्या फोनवर दिव्यांग व्यक्तींना संपर्क साधणे शक्य होणार आहे. ज्या दिव्यांगांना अजिबातच चालता येत नाही, तसेच दिसत नाही अशांना त्यांच्या घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत आणि मतदान झाल्यानंतर त्यांच्या घरात सोडण्यापर्यंतची सुविधा दिली जाणार आहे. जेथे दिव्यांग व्यक्ती मतदानास जाणार आहेत, त्या मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा असेल. त्यांच्याकरिता असलेल्या वाहनात एक स्वयंसेवक असेल. तो त्यांना मदत करेल.
ज्या व्यक्ती अंध आहेत त्यांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपितील मतदान ओळखपत्र (व्होटर स्लीप) दिले जाणार आहे. ज्यांना ब्रेललिपी समजत नाही, त्यांच्याकरिता १४ ते १७ वयोगटातील स्वयंसेवक मदतीला दिले जाणार असून, ते मतदान प्रक्रियेवेळी मदत करतील. बहिर्वक्र भिंगसुद्धा मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्यातरी झोनल आॅफिसरची वाहने अशा व्यक्तींना
ने-आण करण्याकरिता वापरली जाणार असून, जेथे आवश्यक आहेत तेथे काही वाहने भाड्याने घेतली जाणार आहेत.

कोल्हापूर दक्षिण
अंध मतदार - १७३
कर्णबधिर मतदार - २१०
अस्थिव्यंग मतदार - ९०५
इतर व्यंग मतदार - ४८०
एकूण - १७६८

कोल्हापूर उत्तर
अंध मतदार - ४०
अस्थिव्यंग मतदार -१९७
एकूण - २३७

Web Title: Government assistance for Divya Voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.