ग्रामीण महिलांना सक्षम करण्यास शासन कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:59+5:302021-03-08T04:23:59+5:30
: कुरुकली येथे महिला मेळावा उत्साहात मुरगूड : आजच्या महिला विविध क्षेत्रात यशस्वी होताना दिसत आहेत; मात्र ग्रामीण भागातील ...
: कुरुकली येथे महिला मेळावा उत्साहात
मुरगूड : आजच्या महिला विविध क्षेत्रात यशस्वी होताना दिसत आहेत; मात्र ग्रामीण भागातील महिला अजूनही चूल आणि मूल एवढ्यातच अडकून पडल्या आहेत. या सर्वच ग्रामीण भागातील महिलांना बचत गट व ग्रामसंघाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपक्रम वाड्या-वस्त्यांवरील घराघरांच्या चुलीपर्यंत पोहोचणार आहे, असा विश्वास प्रभाग समन्वयक पूनम थोरात यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत भरारी महिला ग्रामसंघाच्या वतीने महिला दिनानिमित्त कुरुकली येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच मीनाक्षी कुंभार होत्या. बिद्री साखर कारखान्याच्या संचालिका व भरारी ग्रामसंघाच्या अध्यक्षा अर्चना विकासराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्या तिराळे, सुरेखा आरेकर, मंगल पाटील, शोभा पाटील, मनीषा पाटील, यशोदा कांबळे, संगीता तिराळे, सकुताई पाटील, सविता विलास पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी वरिष्ठ वर्धिनी मंगला मनोज चौधरी, दयानंद पाटील, सविता भगवंत पिंपळकर, योगिता अनिल कुमरे, विकासराव पाटील- कुरुकलीकर, सरपंच मीनाक्षी कुंभार, उपसरपंच गिरीश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सहभागी महिलांना अर्चना पाटील यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.
फोटो ओळ : कुरुकली (ता. कागल) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत भरारी महिला ग्रामसंघाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात बोलताना पूनम थोरात, व्यासपीठावर ‘बिद्री’च्या संचालिका अर्चना पाटील, सरपंच मीनाक्षी कुंभार व समोर उपस्थित महिला.