प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची निर्दशने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:40 PM2019-07-03T14:40:08+5:302019-07-03T14:45:13+5:30
सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत, चतुर्थ श्रेणीच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या एका पाल्यास शासन सेवेत नोकरी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
कोल्हापूर : सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत, चतुर्थ श्रेणीच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या एका पाल्यास शासन सेवेत नोकरी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम,पाटबंधारे,गव्ह.प्रेस. सी.पी.आर. हॉस्पिटल, शिक्षण खाते, गव्ह.पॉलीटेक्निक, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादि ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
शिष्टमंडळात अनिल लवेकर, वसंत डावरे,विलासराव कुरणे, हशमत हावेरी, संजीवनी दळवी, भरत रसाळे,राजेश वरक,सुधाकर सावंत,संजय आयरे,विठ्ठल वेलणकर, अनिल खोत, रमेश भोसले, संजय क्षीरसागर, सतीश ढेकळे, उदय लांबोरे उपस्थित होते.