सरकार काम करण्याचे असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:34+5:302021-03-15T04:23:34+5:30

चंदगड : तालुक्यातील पन्नास टक्के ग्रामपंचायतींवर आपल्या विचारांना मानणारे लोक निवडून आले आहेत, ही खरचं कौतुकाची बाब आहे. सरकार ...

The government has to work | सरकार काम करण्याचे असते

सरकार काम करण्याचे असते

Next

चंदगड : तालुक्यातील पन्नास टक्के ग्रामपंचायतींवर आपल्या विचारांना मानणारे लोक निवडून आले आहेत, ही खरचं कौतुकाची बाब आहे. सरकार कुणाचं आहे हे मनात न आणता काम करायची जिद्द ठेवा तसेच कोण गेलं, कोण राहील याची चिंता आपण कधीच केली नाही. पक्ष, संघटना कोण सोडून गेले हे महत्त्वाचं नसत. गरीब कार्यकर्त्यांची संघटना ही सहजासहजी ढळणारी नाही. राजकारण एका व्यक्तीवर चालत नसते. सरकार काम करणाऱ्यांचे असतं. हिम्मत दाखविणाऱ्यांनाच परमेश्वरही मदत करतो म्हणून जिद्द ठेवा व काम करा तुमच्या प्रत्येक कामात खारीचा वाटा उचलू, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी दिली.

सुपे (ता. चंदगड) येथे भाजपतर्फे आयोजित नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, सुनील काणेकर, रामभाऊ पारसे, अशोक पाटील, सचिन बल्लाळ यांचीही भाषणे झाली. यावेळी मान्यवरांच्याहस्ते नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार झाला.

कार्यक्रमास उपसभापती मनिषा शिवणगेकर, शांताराम पाटील, ‘गोकुळ’चे संचालक दीपक पाटील, अंकुश गवस, अशोक पाटील, शामराव बेनके, बबन देसाई, मायाप्पा पाटील, दिलीप चंदगडकर, समृद्धी काणेकर, रत्नप्रभा देसाई, रवी बांदिवडेकर, विठाबाई मुरकुटे, राम पाटील, नामदेव कांबळे, अशोक कदम, लक्ष्मण गावडे, सटूप्पा पेडणेकर, मोहन परब, धैर्यशील सावंत भोसले, भावकू गुरव, योगेश कुडतरकर, यशवंत सोनार, संगम नेसरीकर, स्वप्नाली बोकडे, पंकज तेलंग, सुरेश सातवणेकर, उदयकुमार देशपांडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिल शिवनगेकर यांनी प्रास्ताविक केले. बी. आर. चिगरे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच आर. जी. पाटील यांनी आभार मानले.

----------------------------------

* फोटो ओळी : सुपे (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी भरमू पाटील, शिवाजी पाटील, सचिन बल्लाळ, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : १४०२२०२१-गड-०५

Web Title: The government has to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.