शासकीय वसतिगृहे तात्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:04+5:302021-04-07T04:25:04+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वसतिगृहे अद्याप बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी वसतिगृहे ...

Government hostels start immediately | शासकीय वसतिगृहे तात्काळ सुरू करा

शासकीय वसतिगृहे तात्काळ सुरू करा

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वसतिगृहे अद्याप बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी वसतिगृहे तात्काळ सुरू करा, अशी मागणी आंबेडकरी विचार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

याबाबत प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात, राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली. मात्र, कोरोनाच्या कारणावरून शासकीय वसतिगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. वसतिगृहांमध्ये कोविड सेंटर सुरू केली आहेत. त्यामुळे शहराच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

शासनाने वसतिगृहे तातडीने सुरू करावीत. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यापासून वसतिगृहे सुरू होईपर्यंत कालावधीतील विद्यार्थ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’ योजनेचा लाभ द्यावा. त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच वसतिगृहातील कोविड सेंटर नगपालिका, महानगर पालिकेकडील हॉल, खाजगी मंगल कार्यालयांमध्ये हलवावीत.

निवेदनावर, परशुराम कांबळे, अर्जुन दुंडगेकर, दिलीप कांबळे, प्रकाश कांबळे, शिवराज कांबळे, ज्ञानराजा चिघळीकर, एस. आर. कांबळे, एस. पी. थरकार, संजय कांबळे, एस. बी. बालेशगोळ, संतोष कांबळे, दयानंद कांबळे, मारुती कांबळे, विजयकुमार शिरगावकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

-------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर ज्ञानराजा चिघळीकर, परशुराम कांबळे यांनी निवेदन दिले.

क्रमांक : ०६०४२०२१-गड-०४

Web Title: Government hostels start immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.