शासन यादीबाह्य औषधांची खरेदी : जिल्हा परिषदेतील प्रकार ,अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:30 AM2018-02-27T00:30:34+5:302018-02-27T00:30:34+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी शासनाने ठरवून दिलेल्या यादीबाहेरील औषधांची खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Government list: Non-purchase of drugs: Type of Zilla Parishad, submission of report | शासन यादीबाह्य औषधांची खरेदी : जिल्हा परिषदेतील प्रकार ,अहवाल सादर

शासन यादीबाह्य औषधांची खरेदी : जिल्हा परिषदेतील प्रकार ,अहवाल सादर

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी शासनाने ठरवून दिलेल्या यादीबाहेरील औषधांची खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल वित्त विभागाने सोमवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सादर केल्याचे समजते.

आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत गेले वर्षभर या ना त्या तक्रारी सुरू आहेत. अशातच औषध खरेदी जादा दराने केल्याच्याही तक्रारी सुरू झाल्या. सुरुवातीला या तक्रारींची दखल घेतली गेली नाही; मात्र नंतर या तक्रारी वाढल्याने या खरेदीची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांच्याकडे चौकशी करण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे हा अहवाल दिला आहे. मात्र, हा अहवाल अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा नाही. सकृतदर्शनी औषध खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेले दोन दिवस वित्त विभागाने या चौकशी अहवालातील विविध मुद्द्यांची छाननी केली असून, यामध्ये शासनाच्या यादीबाहेरील औषधांची खरेदी करण्यास मनाई असताना ती केल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या दरपत्रकानुसार औषधांची खरेदीही करण्यात आली असून, त्याबाबतही भिन्नता आढळत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.

डॉ. दिलीप पाटील यांच्या चौकशीची शक्यता
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत वरिष्ठ पातळीवर नाराजी असून, एकीकडे आरोग्य विभागाकडे संवेदनशील विभाग म्हणून पाहिले जात असताना तितकी संवेदनशीलता डॉ. पाटील यांच्याकडे नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. वित्त विभागाच्या अहवालानुसार हा अहवाल प्रशासन विभागाकडे पाठवून यावर एखाद्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाºयाचे मत घेतले जाणार असून, यानंतर कदाचित डॉ. पाटील यांना चौकशीची नोटीस काढली जाण्याची शक्यता आहे.

वित्त विभागाकडून छाननी
औषध खरेदीबाबतचा जो अहवाल देण्यात आला आहे तो तांत्रिक होता. वैद्यकीय अधिकाºयांनीच ही चौकशी केली असल्याने त्यामध्ये वैद्यकीय दृष्टीने विश्लेषण करण्यात आले आहे. मात्र, जादा दराने खरेदीचा प्रश्न असल्याने वित्त विभाग यामध्ये नेमकेपणाने छाननी करू शकेल यासाठी डॉ. खेमनार यांनीच हा अहवाल वित्त विभागाकडे पाठविला होता. या छाननीनंतर सोमवारी हा अहवाल प्राप्त झाला आहे.

Web Title: Government list: Non-purchase of drugs: Type of Zilla Parishad, submission of report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.