सरकारला ‘वाझे प्रकरणा'चा धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:26+5:302021-03-16T04:26:26+5:30
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही. सध्या या प्रकरणाचा तपास एनआयए करत असला, तरीही ...
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही. सध्या या प्रकरणाचा तपास एनआयए करत असला, तरीही राज्य सरकारने प्रारंभी जी कारवाई केली, ती योग्यच होती, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी केले. सोमवारी ते खासगी दौऱ्यासाठी कोल्हापुरात आले असता, पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. त्यावेळी तपास दहशतवादविरोधी पथकाकडे दिला होता. राज्य सरकारने योग्य ती कारवाई केली होती. आता हा तपास एनआयएकडे आहे. विरोधक सरकारवर आरोप करत असले, तरी सरकारला धोका नाही. कायदे, नियम पाळूनच सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतले आहे. सेवेत नसताना कोणीही कोणत्याही पक्षात जाऊ शकतो, त्याप्रमाणे निलंबित कालावधीत वाझे शिवसेनेत गेले होते, असेही ते म्हणाले.