सरकारी कार्यालये होणार थुंकीमुक्त- शैलेश बलकवडे : चळवळीला देणार बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:46+5:302021-01-08T05:13:46+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा प्रभाव घटत असताना, अनेकजण सार्वजनिक ठिकाणी थुंकताना दिसत आहेत. याला चाप बसावा, याकरिता ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’ चळवळीच्यावतीने ...
कोल्हापूर : कोरोनाचा प्रभाव घटत असताना, अनेकजण सार्वजनिक ठिकाणी थुंकताना दिसत आहेत. याला चाप बसावा, याकरिता ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’ चळवळीच्यावतीने मंगळवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना प्रशासनाची मदत मिळावी, अशी विनंती करण्यात आली. यावेळी बलकवडे यांनी प्रथमतः शहरातील सरकारी कार्यालये थुंकीमुक्त व्हावीत, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
‘अँटी स्पिट मूव्हमेंट’ कोल्हापूर यांच्यावतीने सप्टेंबर महिन्यापासून कोल्हापूर शहर थुंकीमुक्त व्हावे, यासाठी चळवळीच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक या मोहिमेत सहभागी होत आहेत. बलवडे यांना या आंदोलनाच्यावतीने गेल्या चार महिन्यांत केलेल्या जनजागृती मोहिमेची माहिती देण्यात आली. तसेच प्रशासनाकडून थुंकी बहाद्दरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी शहर आरोग्य व स्वच्छता यासाठी अत्यंत महत्त्वाच्या या लोकचळवळीला प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
‘अँटिस्पिट मूव्हमेंट कोल्हापूर’च्यावतीने दीपा शिपुरकर, सारिका बकरे, अभिजित गुरव, आनंद आगळगावकर, सागर बकरे यांनी या चळवळीची भूमिका मांडली.
--
फोटो नं ०५०१२०२१-कोल-ॲन्टी स्पीट मुव्हमेंट
ओळ : ‘ॲन्टी स्पीट मूव्हमेंट’च्यावतीने सोमवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना थुंकीमुक्त चळवळीला पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दीपा शिपुरकर, सारिका बकरे, अभिजित गुरव, आनंद आगळगावकर उपस्थित होते.
--