शासकीय आदेशाने गुरुजींचे ‘गो गोवा गॉन’-अखिल भारतीय शिक्षक अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:44 AM2019-02-07T00:44:57+5:302019-02-07T00:46:01+5:30
गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशनासाठी दि. ७, ८, ९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढल्यानंतर
कोल्हापूर : गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशनासाठी दि. ७, ८, ९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढल्यानंतर गोवा सहलीचा बेत आखलेल्या गुरुजींनी बुधवारी थेट शाळेतच हजेरी लावली.अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे महाअधिवेशन व राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे ८ व ९ रोजी गोव्यात आयोजन केले आहे.
यासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातील मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांसह बरेच मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्य अधिवेशन ९ रोजी असताना बऱ्याच शिक्षकांनी ३ ते १३ फेब्रुवारी अशी रजा घेतली आहे. राज्यभरातील जवळपास पाच लाख शिक्षक रजेवर गेले आहेत.
रजेवर जाताना शासनानेच नैमित्तिक रजा मंजूर केली असल्याचे शिक्षक संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले. अधिवेशन दोन दिवसांचे असताना शिक्षकांनी १० दिवसांची रजा घेतल्यामुळे शैक्षणिक वर्तुळातून, विशेषत: पालकांतून संताप व्यक्त केला जात होता. या अधिवेशनासाठी राज्यभरातील निम्म्याहून अधिक शिक्षक एकाचवेळी रजेवर गेल्याने शाळा ओस पडू लागल्या होत्या.
याबद्दल तक्रारी झाल्यानंतर शिक्षण सचिवांनी याची गंभीर दखल घेत थेट कारवाईचा बडगाच उगारला आहे. सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना त्यांनी ई-मेल पाठवून ‘तीन दिवसांव्यतिरिक्त रजा असणाºयांची यादी तयार करून कारवाईस सुरुवात करावी,’ असे आदेश दिले आहेत.
या संदर्भात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांना माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तत्काळ कारवाई केली जाईल असे सांगितले. जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागानेही गटशिक्षणाधिकाºयांना वाढीव रजा मंजूर करू नका, तातडीने अहवाल पाठवून द्या, अशा सूचना दिल्या आहेत.
आज कारवाईच्या नोटिसा निघणार
तीन दिवसांव्यतिरिक्त रजा घेतलेल्या शिक्षकांची यादी आज, गुरुवारी दुपारपर्यंत पाठविण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाºयांना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. या याद्या संकलित झाल्यानंतर सायंकाळी तातडीने कारवाईच्या नोटिसा लागू होणार आहेत. यातही ज्या शाळेतील सर्वाधिक शिक्षक अधिवेशनाच्या रजेवर गेले आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कोल्हापूरातून पाच हजार शिक्षक अधिवेशनास
कारवाईच्या धसक्याने बहुतांश शिक्षकांनी बुधवारीच शाळेत हजेरी लावत हजेरीपत्रकावर सह्या केल्या. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजारांवर शिक्षक अधिवेशनासाठी गेले होते. गटशिक्षणा-धिकाºयांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा देत बºयापैकी शिक्षक कोल्हापुरात परतल्याचे सांगितले.
मुख्य अधिवेशन ९ रोजी असताना बºयाच शिक्षकांनी ३ ते १३ फेब्रुवारी अशी रजा घेतली
केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातील मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांसह बरेच मंत्री उपस्थित राहणार
राज्यभरातील जवळपास पाच लाख शिक्षक रजेवर गेले आहेत.
अधिवेशन दोन दिवसांचे असताना शिक्षकांनी १० दिवसांची रजा घेतल्यामुळे संताप
‘लोकमत’ मध्ये सर्वप्रथम वृत्त
दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी गुरुजी दहा दिवसांच्या सुटीवर गेल्याने शाळा ओस पडणार असल्याचे वास्तव सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे मांडले. शासनाने याची दखल घेत, कारवाईचा बडगा उगारत गुरुजींचा सहलीचा बेत हाणून पाडला.