सर्पोद्यानासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:23 AM2021-03-06T04:23:06+5:302021-03-06T04:23:06+5:30

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पोद्यानासाठी शासनाने १० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तानाजी वाघमारे यांनी दाटे येथे ...

The government should provide space for snake garden | सर्पोद्यानासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी

सर्पोद्यानासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी

Next

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पोद्यानासाठी शासनाने १० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तानाजी वाघमारे यांनी दाटे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे बाबूराव टक्केकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी सर्पोद्यान सुरू केले. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, तो शत्रू नाही. हा विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. प्रसंगी कुटुंबाचा व समाजाचा रोष ओढवून घेतला. हाल सोसले त्यांच्याच शैक्षणिक संस्थेच्या मामासाहेब लाड विद्यालयाच्या परिसरातील सर्पोद्यानात विविध जातींच्या सर्वांचे संरक्षण व सखोलपणे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक संशोधनात्मक केंद्र निर्माण केले. सापांविषयी लोकांत असलेली भीती दूर केली. ढोलगरवाडी व परिसरातील लोक गेली तीन-चार दशके सापांबाबतीत भयमुक्त आहेत, असे सांगून ढोलगरवाडी हायस्कूलचा प्रत्येक विद्यार्थी सर्पमित्र आहे. देशातील असे एकमेव शिक्षण केंद्र आहे की, येथे विद्यार्थीदशेत सापाबद्दल ज्ञान मिळत आहे.

कोणतीही मदत नसताना हे सर्पोद्यान सुरू आहे. सर्पोद्यानासाठी शासनाने १० एकर जागा व सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठे सर्पोद्यान उभारता येईल व हे आशिया खंडातील एक वैशिष्ट्यपूर्ण सर्पोद्यान, सर्पसंशोधन केंद्र निर्माण होईल. यासाठी शासनाने घातलेले निर्बंध काढावेत, असे वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Web Title: The government should provide space for snake garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.