रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:22 AM2021-02-14T04:22:23+5:302021-02-14T04:22:23+5:30
जयसिंगपूर : कृषी कायद्यातून बाजार समित्याच बरखास्त करण्याची भूमिका केंद्र सरकार घेत आहे. अडचणीच्या काळातही जयसिंगपूर बाजार समिती चांगल्या ...
जयसिंगपूर : कृषी कायद्यातून बाजार समित्याच बरखास्त करण्याची भूमिका केंद्र सरकार घेत आहे. अडचणीच्या काळातही जयसिंगपूर बाजार समिती चांगल्या पध्दतीने सुरू आहे. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग मिळाला आहे. येणाऱ्या काळात रेशीम उद्योगाला चांगले दिवस येण्यासाठी शासन निश्चितच प्रयत्न करेल, असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला.
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व रेशीम संचालनालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नाप्पाण्णा कुंभार मार्केट यार्डमध्ये रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते झाले. स्वागत सभापती रायगोंडा पाटील, तर सुभाषसिंग रजपूत यांनी बाजार समितीचा आढावा विषद केला. डॉ. ए. डी. जाधव, डॉ. कविता देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी आण्णासाहेब पाटील, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, डॉ. अशोकराव माने, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, वैभव उगळे, सहायक निबंधक प्रेमदास राठोड, उपसभापती महंमदशफी पटेल, सचिव सुनील गावडे उपस्थित होते. विजयसिंह देशमुख यांनी आभार मानले.
-------------------
मंत्री यड्रावकरांनी पुकारले सौदे
रेशीम कोष केंद्राच्या ठिकाणी रेशीम कोषचे सौदे पार पडले. राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुढाकार घेत सौदे पुकारले. रेशीम कोषचा राज्यातील उच्चांकी सौदा यावेळी झाला. किलोला ६७० रुपये दर मिळाला. मंगळवारी व शुक्रवारी सौदे पुन्हा घेतले जाणार आहेत.
फोटो -१३०२२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते झाले. (छाया-सुभाष जाधव)