शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत शासन निर्णयांशी बांधील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:38+5:302021-08-14T04:30:38+5:30

शास्त्र आणि गणित विषयाच्या शिक्षकांच्या पदोन्नतीवरून गेले महिनाभर जिल्हा परिषदेत वातावरण तापले आहे. २०१३ आणि २०१६ चे शासन आदेश, ...

The government will be bound by the decisions regarding the promotion of teachers | शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत शासन निर्णयांशी बांधील

शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत शासन निर्णयांशी बांधील

Next

शास्त्र आणि गणित विषयाच्या शिक्षकांच्या पदोन्नतीवरून गेले महिनाभर जिल्हा परिषदेत वातावरण तापले आहे. २०१३ आणि २०१६ चे शासन आदेश, संघटना पदाधिकाऱ्यांची वेगवेगळी मते पाहून शुक्रवारी सर्व संघटना प्रतिनिधींच्या बैठकीचे शाहू सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष राहुल पाटील, शिक्षण सभापती रसिका पाटील, अमर पाटील, शशिकांत खोत, अधिकारी आशा उबाळे, राहुल कदम यावेळी उपस्थित होते.

यावेळी बारावी शास्त्र शिक्षण झालेले, विज्ञान पदवीधर, पदवीधर अशा विविध संवर्गातील शिक्षक प्रतिनिधींचे म्हणणे यावेळी ऐकून घेण्यात आले. अवघड आणि सर्वसाधारण गावांच्या यादीबाबतही यावेळी चर्चा झाली. याबाबत वस्तुनिष्ठ पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचा अहवाल आल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल असे चव्हाण यांनी सांगितले. भोसले, राजाराम वरुटे, संभाजी बापट, गौतम वर्धन, सर्जेराव सुतार, रवी पाटील, कृष्णात कारंडे, प्रसाद पाटील, प्रमोद तौंदकर यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

चौकट

सेल्फीबाबत गैरसमज नको

यावेळी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या सेल्फी संकल्पनेला विरोध केला. हवे तर बायोमेट्रिक करा, परंतु सेल्फी टाकण्याची सक्ती नको अशी मते व्यक्त करण्यात आली. यावेळी कोरोनाच्या काळात बायोमेट्रिक करण्यात येणार नाही. सेल्फी काढल्यानंतर तो कुठेही पाठवायचा नाही. उद्या तुम्ही वेळेवर आला नाहीत आणि कुणी विचारणा केली तर तुमच्याकडे पुरावा राहील. सेल्फीबाबत गैरसमज करून घेऊ नका, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Web Title: The government will be bound by the decisions regarding the promotion of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.