शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाला देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:42+5:302021-03-25T04:24:42+5:30

यावेळी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य प्राचार्य ए. बी. पाटील, राज्य अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, ...

The government will propose an increase in the honorarium of school nutrition workers | शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाला देणार

शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाला देणार

googlenewsNext

यावेळी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य प्राचार्य ए. बी. पाटील, राज्य अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, राज्य सचिव डॉ. अशोक थोरात यांनी मागण्यांची मांडणी केली. तमिळनाडू, केरळ, हरियाणा राज्यांप्रमाणे स्वयंपाकी, मदतनीस या कामगारांचे मानधन किमान साडेसात हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली. ही मागणी योग्य असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले. आमच्या विभागाच्यावतीने मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. शालेय पोषण आहार कामगारांमधील स्वयंपाकी, मदतनीस यांना ‌लवकरच मानधन वाढ मिळेल, असे आश्वासन वाघमोडे यांनी दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ अखेरचे मानधन तत्काळ मदतनीसांना देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेतील शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक दीपक माने यांना दूरध्वनीवरून दिल्या. यावेळी मीरा शिंदे, कुसुमताई देशमुख, अमोल नाईक, मन्सुफभाई कोतवाल, दिलीप पोफळे, अनिल कराळे उपस्थित होते.

Web Title: The government will propose an increase in the honorarium of school nutrition workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.