आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन प्रश्नी घेतली राज्यपालांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:58 PM2022-04-28T18:58:53+5:302022-04-28T19:09:45+5:30
आंबेओहोळ प्रकल्पामध्ये दोनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. अनेक प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहेत
रवींद्र येसादे
भादवण : आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुर्नवसन प्रश्नी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबई येथील राजभवनात भेट घेतली. यावेळी या रखडलेल्या पुर्नवसना प्रश्नी निवेदनाद्वारे लक्ष वेधले.
आंबेओहोळ प्रकल्पामध्ये दोनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. अनेक प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहेत. संकलन दुरुस्ती अद्यापही झाले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना धरणांमध्ये पाणी साठवले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गेली वीस वर्ष धरणग्रस्त शासनाकडे पुनर्वसनाची मागणी मागणी करीत आहेत मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले.
यावेळी महादेव खाडे, सागर सरोळकर, राजू देशपांडे, युवराज सुतार, प्रकाश बेलवाडे आदी उपस्थित होते.