शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नणंदकर यांची पुण्याला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:46 AM2019-03-13T11:46:47+5:302019-03-13T11:48:26+5:30
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात बदली झाली. या बदलीचे आदेश शुक्रवारी (दि. ८) वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले.
कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात बदली झाली. या बदलीचे आदेश शुक्रवारी (दि. ८) वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यावर्षी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी पदभार स्वीकारले. यापूर्वी ते मुंबईतील जे. जे. रुग्णालयात याच पदावर होते. वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत येणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संवाद साधून समन्वय साधला.
त्यांच्या कार्यकाळात पतितपावन संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी ‘सीपीआर’मधील काही कर्मचारी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन सेवा बजावीत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केली होती. नणंदकर यांनी याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हे प्रकरण चौकशीसाठी पाठविले होते. दरम्यान, या बदलीबाबत अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.