मेघना चौगले यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्याहस्ते प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:41+5:302020-12-30T04:33:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कुठल्याही पदासाठी, पैशासाठी अथवा मान-सन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्त सुखाय केलेले समाजकार्य आत्मानंद देते. कोरोनाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कुठल्याही पदासाठी, पैशासाठी अथवा मान-सन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्त सुखाय केलेले समाजकार्य आत्मानंद देते. कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही. त्यामुळे मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून यापुढेही आरोग्य सेवकांनी आपले सेवाकार्य सुरूच ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. कोल्हापूरच्या डॉ. मेघना चौगुले लिखित ‘न्यूरो पॅथॉलॉजी ऑफ ब्रेन ट्यूमर विथ रेडिओलॉजीक कोरिलेट्स’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रविवारी ते बोलत होते. राजभवन येथे हा कार्यक्रम झाला.
या पुस्तकात मेंदूच्या व मज्जातंतूच्या गाठींमुळे रुग्णाला होणारा त्रास, त्याची लक्षणे, शास्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या निदानाची माहिती व ९०० उत्कृष्ट प्रतिमा तसेच त्या रुग्णाचे भवितव्य व अचूक निदान झाल्यामुळे त्या रुग्णाचे पुढील भवितव्य याची माहिती पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. यामुळे गाठीचे निदान आणि रुग्ण उपचाराला नक्कीच फायदा होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीतर्फे ५० कोरोना याेध्द्यांचा सन्मान राज्यपालांच्याहस्ते करण्यात आला.
२९१२२०२०-कोल-मेघना चौगले बूक
कोल्हापूरच्या डॉ. मेघना चौगुले लिखित ‘न्यूरो पॅथॉलॉजी ऑफ ब्रेन ट्यूमर विथ रेडिओलॉजीक कोरिलेट्स’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन येथे झाले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.