अॅड. पानसरे हत्या प्रकरण: सचिन अंदूरे, विरेंद्र पवार यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:39 PM2022-04-25T12:39:48+5:302022-04-25T12:42:32+5:30
संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी चार महिन्यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेळके यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्तेबाबत सरकारी पक्षाकडे कोणताही सबळ पुरावा नसल्याने यातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे व सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे असा केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी शेळके यांनी फेटाळला.
अॅड. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सबळ पुरावा नसल्याने विरेंद्र तावडे व सचिन अंदूरे यांना दोषमुक्त करावे असा संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी चार महिन्यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेळके यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. पण सरकार पक्षातर्फे खटल्यात सबळ पुरावा आणि खटला चालविण्यात पुरावे दाखल केले असल्याने संशयितांचा दोषमुक्त करणेचा अर्ज न्यायाधीश शेळके यांनी आज, सोमवारी फेटाळला. अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.