गोविंद पानसरे हत्याप्रकरण: आजची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

By सचिन भोसले | Published: August 5, 2022 04:25 PM2022-08-05T16:25:05+5:302022-08-05T16:26:26+5:30

सरकार पक्षातर्फे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी मागणी करण्यात आली.

Govind Pansare murder case, The next hearing will be held on August 23 | गोविंद पानसरे हत्याप्रकरण: आजची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

गोविंद पानसरे हत्याप्रकरण: आजची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Next

सचिन भोसले

कोल्हापूर: ज्येष्ठ नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी आजची सुनावणी न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली. पानसरे हत्येचा तपास एटीएस कडे वर्ग केला आहे. त्याची ऑर्डर न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी सरकार पक्षातर्फे मागणी करण्यात आली. त्यास आरोपींच्या वकिलांनी ही त्यास हरकत घेतली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे. आजच्या सुनावणीसाठी सारंग अकोलकर, विनय पवार वगळता सर्व आरोपी न्यायालयात आज हजर होते.

२७ जुलै रोजी झालेल्या दोष निश्चिती सुनावणीवेळी सर्व संशयित आरोपी उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलली. आज याबाबत सुनावणी होती. मात्र न्यायालयाने पुन्हा ही सुनावणी पुढे ढकलली. मागील सुनावणीस संशयित विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर व समीर गायकवाड हे उपस्थित होते. तर इतर सहाजण अनुपस्थित राहिले. आजच्या सुनावणीस सारंग अकोलकर, विनय पवार वगळता सर्व आरोपी न्यायालयात आज हजर होते.

Web Title: Govind Pansare murder case, The next hearing will be held on August 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.