शासनाने मागणी केल्यास निलेवाडी पुनर्वसनासाठी आंबीलटेकाची 'ती' जागा देणार : आमदार विनय कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:41+5:302021-08-23T04:27:41+5:30
निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील पुनर्वसनाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार विनय कोरे बोलत होते. आमदार डॉ. कोरे पुढे म्हणाले, महापुराने ...
निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील पुनर्वसनाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार विनय कोरे बोलत होते.
आमदार डॉ. कोरे पुढे म्हणाले, महापुराने वारणा नदीकाठ उद्ध्वस्त झाला आहे. सोमवारी (दि. २३) पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्याशी बैठक आहे. त्यामध्ये निलेवाडी पुनर्वसनाबाबत चर्चा करणार आहे. वारणा दूध संघाची आंबील टेकाची व अन्य दुसरी जागा आहे. शासनाने मागणी केल्यानंतर निलेवाडी पुनर्वसनासाठी दोन्हीपैकी कोणतीही जागा देण्यास तयार असल्याचेही डॉ. कोरे यांनी सांगितले.
आदिती माने या लहान मुलीने भाषणात पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा मांडल्या. गावकऱ्यांच्या वतीने बाबासाहेब माने यांनी मनोगत व्यक्त केले. आंबिलटेक येथेच पुनर्वसन व्हावे, अशी मागणीही केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, बहिरेवाडीचे माजी सरपंच रवींद्र जाधव, पारगावचे प्रदीप देशमुख, उपसरपंच तानाजी जाधव, वसंत खोत, विकास माने उपस्थित होते. मोहन जाधव यांनी आभार मानले.
फोटो : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील पुनर्वसनाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार. विनय कोरे. सोबत अशोकराव माने, बाबासाहेब माने, प्रदीप देशमुख उपस्थित होते.