ग्रा. पं. सदस्यांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:40+5:302021-02-06T04:44:40+5:30

सरपंच संदेश भोपळे व उपसरपंच स्नेहल विजय कोटकर यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्तक्षेपामुळे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळत नाही, ...

Gr. Pt. Typical fasting of members | ग्रा. पं. सदस्यांचे लाक्षणिक उपोषण

ग्रा. पं. सदस्यांचे लाक्षणिक उपोषण

Next

सरपंच संदेश भोपळे व उपसरपंच स्नेहल विजय कोटकर यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्तक्षेपामुळे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळत नाही, असा आरोप केला.

गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातील आशय पुढीलप्रमाणे- २०१८ मध्ये भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीला पराजित करून सत्ता काबीज केली. हा राग मनात धरत ग्रामविकास अधिकारी बुवा यांच्यावर भ्याड हल्ला व सरपंच यांच्यावर विनयभंगाची खोटी तक्रार देऊन ग्रामपंचायतीच्या कारभारात विस्कळीतपणा आणण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकारे यश न मिळाल्याने ग्रामविकास अधिकारी बुवा यांची वेगळ्या पद्धतीचा वापर करून त्यांची बदली केली. ग्रामविकास अधिकारी कायमस्वरूपी मिळावा म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. पं. विभाग अरुण जाधव यांना सरपंच ग्रामपंचायत सदस्य मंडळ वारंवार भेटूनदेखील दखल घेतली जात नसल्याने आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारत आहोत.

उपोषणाला राहुल देसाई, शिवराज देसाई यांनी भेट दिली. सरपंच संदेश पांडुरंग भोपळे, उपसरपंच स्नेहल विजय कोटकर, पंचायतीच्या सदस्या गायत्री भोपळे, प्रकाश वास्कर, सुकेशनी सावंत, आशाताई भाट, जयवंत गोरे, रूपाली कुरळे, राहुल कांबळे, अस्मिता कांबळे,

सविता गुरव, अलकेश

कांदळकर, मेघा देसाई, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ-

भुदरगड पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषणप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, सरपंच संदेश पांडुरंग भोपळे, उपसरपंच स्नेहल विजय कोटकर आदी.

Web Title: Gr. Pt. Typical fasting of members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.