जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे एकटी संस्थेस धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:54+5:302021-07-03T04:16:54+5:30
फोटो (०२०७२०२१-कोल-जनरल प्रॅॅक्टिशनर्स असोसिएशन) : कोल्हापुरात गुरुवारी डॉक्टर्स डे निमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी एकटी संस्थेस अन्नधान्याचे ...
फोटो (०२०७२०२१-कोल-जनरल प्रॅॅक्टिशनर्स असोसिएशन) : कोल्हापुरात गुरुवारी डॉक्टर्स डे निमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी एकटी संस्थेस अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
भारती विद्यापीठात वेबिनार
कोल्हापूर : येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात एनडीटी आणि इमारतीच्या संरचनात्मक आरोग्य देखरेख या विषयावर ऑनलाईन वेबिनार घेण्यात आला. त्यामध्ये बंगलोर येथील दयानंद सागर अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नीतू यांनी मार्गदर्शन केले. प्रा. नितीश मोहिते यांनी वेबिनारचे आयोजन केले. त्यांना प्राचार्य डॉ. व्ही. आर. घोरपडे, स्थापत्य विभागप्रमुख प्रा. व्ही. एस. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये कार्यशाळा
कोल्हापूर : येथील डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात ‘रोल ऑफ स्टॅटिस्टिक्स इन बँकिंग अँड फायनान्स’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव ॲड व्ही. एन. पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील(डीआरके कॉमर्स कॉलेज), शिवाजी डिसले (कोटक महिंद्रा बँक), पवन जिन्दम (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया), डॉ. संतोष सुतार (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट शिवाजी विद्यापीठ) यांनी मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. एन. एच. जाधव यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेसाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष प्रसाद कामत, सदस्य डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर यांचे मार्गदर्शन, तर डॉ. एस. व्ही. बनसोडे, एस. एस. कदम, ए. एस. जाधव, टी. एल. कांबळे यांचे सहकार्य लाभले.