‘मानव वेल्फेअर सोशल’च्यावतीने तृतीयपंथीयांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 AM2021-05-17T04:21:22+5:302021-05-17T04:21:22+5:30

कोल्हापूर : मानव वेेल्फेअर सोशल फाऊंडेशनतर्फे तृतीयपंथीयांना धान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात पुरेल इतके धान्य ४० तृतीयपंथी कुटुंबांना ...

Grain distribution to third parties on behalf of ‘Human Welfare Social’ | ‘मानव वेल्फेअर सोशल’च्यावतीने तृतीयपंथीयांना धान्य वाटप

‘मानव वेल्फेअर सोशल’च्यावतीने तृतीयपंथीयांना धान्य वाटप

Next

कोल्हापूर : मानव वेेल्फेअर सोशल फाऊंडेशनतर्फे तृतीयपंथीयांना धान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात पुरेल इतके धान्य ४० तृतीयपंथी कुटुंबांना देण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तृतीयपंथी कुटुंबांवरही मोठी संक्रात ओढवली आहे. कसेबसे दहावी, बारावी शिक्षण झाल्याने उदरनिर्वाह करत ही कुटुंब जीवन जगत आहेत. या कुटुंबांना फाऊंडेशनतर्फे धान्य किटचे वाटप करण्यात आले.

यासाठी विराज सोंसूरकर, अमोल कोळी, अजिंक्य देसाई, योगेश कागले, स्वागत कांडेकरी, प्रकाश घुंगूरकर, अक्षय तिठे, अभिलाश पाटील, शैलेश स्वामी, जयराज साळोखे, वैभव अस्वले, महेश कट्टी, आदींचे सहकार्य लाभले.

फोटो ओळी : मानव वेल्फेअर सोशल फाऊंडेशनतर्फे तृतीयपंथी कुटुंबांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. (फोटो-१६०५२०२१-कोल-मानव फाऊंडेशन)

Web Title: Grain distribution to third parties on behalf of ‘Human Welfare Social’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.