Gram Panchayat Election: कोल्हापुरातील उजळाईवाडीत महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 11:55 AM2022-12-17T11:55:57+5:302022-12-17T11:57:17+5:30

उचगाव : उजळाईवाडी (ता.करवीर)  येथे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात असलेल्या महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर अज्ञात तिघा तरुणांनी दुचाकी घालून हल्ला ...

Gram Panchayat Election, an attempt was made to put a bicycle on the body of a woman candidate husband In Ujalaiwadi in Kolhapur | Gram Panchayat Election: कोल्हापुरातील उजळाईवाडीत महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

Gram Panchayat Election: कोल्हापुरातील उजळाईवाडीत महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

googlenewsNext

उचगाव : उजळाईवाडी (ता.करवीर)  येथे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात असलेल्या महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर अज्ञात तिघा तरुणांनी दुचाकी घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत ते किरकोळ जखमी झाले. आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसात तिघा अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरानंतर गावात एकच खळबळ उडाली. जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी उद्या, रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

याबाबत माहिती अशी की, उमेदवार महिलेचे पती पहाटेच्या सुमारास दारात उभे होते. दरम्यान भरधाव वेगात आलेल्या अज्ञात तिघा तरुणांनी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून ते बाजूला झाले. यावेळी तरुणांनी शिवीगाळ करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत ते रस्त्यावर फरपटत गेल्याने किरकोळ जखमी झाले. हल्लेखोर तरुण मात्र पसार झाले. 

याघटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेत तक्रार दाखल करुन घेतली. हल्लेखोर तरुणांचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Gram Panchayat Election, an attempt was made to put a bicycle on the body of a woman candidate husband In Ujalaiwadi in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.