अस्वलाच्या हल्ल्यात ग्रामपंचायतीचा कर्मचारी जखमी, जंगमहट्टी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:33 PM2022-02-15T18:33:18+5:302022-02-15T18:33:35+5:30

चंदगड: अस्वलाच्या हल्ल्यात जंगमहट्टी (ता.चंदगड) येथील ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. तानाजी शेळके असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. शेळके ...

Gram Panchayat employee injured in bear attack, incident at Jangamhatti | अस्वलाच्या हल्ल्यात ग्रामपंचायतीचा कर्मचारी जखमी, जंगमहट्टी येथील घटना

अस्वलाच्या हल्ल्यात ग्रामपंचायतीचा कर्मचारी जखमी, जंगमहट्टी येथील घटना

googlenewsNext

चंदगड: अस्वलाच्या हल्ल्यात जंगमहट्टी (ता.चंदगड) येथील ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. तानाजी शेळके असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. शेळके यांनी अस्वलाशी दोन हात करत स्वत:चे प्राण वाचवले. 

याबाबत माहिती अशी की, तानाजी शेळके हे सकाळी गावात पाणी सोडण्यासाठी गावच्या बाजूला (जंगल क्षेत्रात) जात असतात. नेहमीप्रमाणे ते सकाळच्या सुमारास पाणी सोडण्यासाठी गेले होते. दरम्यान शेळके  यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात ते जखमी केले. 

मात्र शेळकींनी अस्वलाशी दोन हात करत आपली सुटका करुन घेत बाजूला असणाऱ्या झाडाचा चढले. त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. शेळखे यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती सरपंच विष्णू गावडे यांनी दिली. मात्र अस्वलाच्या वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Gram Panchayat employee injured in bear attack, incident at Jangamhatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.