ग्रामपंचायत बातमी जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:09+5:302020-12-23T04:21:09+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून त्यावर देखरेखीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून त्यावर देखरेखीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे हे नियंत्रण अधिकारी असणार आहेत. तालुक्यांसाठी डॉ. प्रसाद दातार (शिरोळ), सुहास कोरे (हातकणंगले), गुणाजी नलवडे(करवीर), डॉ. विशाल चोकाककर(गगनबावडा), डॉ. हिरालाल निरंकारी (शाहूवाडी), डॉ. अनिल कवठेकर (पन्हाळा), डॉ. अभिजीत शिंदे (कागल), डॉ. मल्लिकार्जुन अथणी (गडहिंग्लज), डॉ. रमेश खोत (चंदगड), डॉ. यशवंत सोनवणे(आजरा), डॉ. सचिन ऐतनाळकर (भुदरगड), डॉ. राजेंद्र शेटे (राधानगरी) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
९.२९ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी ९.२९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक मतदार शिरोळ तालुक्यातील असून येथे १ लाख ४६ हजार ९९९ मतदार आहेत. या पाठोपाठ करवीर (१ लाख ३७ हजार ७५३), कागल (१ लाख २३ हजार ५४६) येथील मतदार संख्या अधिक आहे. या निवडणुकीसाठी १ हजार ७७४ मतदार केंद्रे, १ हजार ४८० प्रभाग व ३ हजार ९९९ सदस्य संख्या जाहीर झाली आहे.
----
इंदुमती गणेश