मंगल कानडेच्या पडक्या घराला ग्रामपंचायत देणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:43+5:302021-08-23T04:27:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव: मुसळधार पावसातही पडक्या भिंतीच्या आडोशाला राहून जीवन जगणाऱ्या मंगल शंकरराव कानडे पडक्या घराची उजळाईवाडीच्या ...

The Gram Panchayat will provide support to the dilapidated house of Mangal Kanade | मंगल कानडेच्या पडक्या घराला ग्रामपंचायत देणार आधार

मंगल कानडेच्या पडक्या घराला ग्रामपंचायत देणार आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उचगाव: मुसळधार पावसातही पडक्या भिंतीच्या आडोशाला राहून जीवन जगणाऱ्या मंगल शंकरराव कानडे पडक्या घराची उजळाईवाडीच्या सरपंच सुवर्णा माने, उपसरपंच सारंगा नाईक यांनी पाहणी करून मदतीचा हात पुढे केला आहे. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदार शीतल मुळे-भांबरे,करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबरोबर उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडून जागेच्या हद्दीसंदर्भात शेजारी व्यक्तीबरोबर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे.

घरकूल प्रश्न मार्गी लागेपर्यंत सरपंच सुवर्णा माने व डी. जी. माने यांनी शाळेतील एका खोलीत मंगल कानडे व मुलाला राहावे यासाठी सहकार्य केले आहे. डी. जी माने व ग्रा. पं .सदस्य तानाजी चव्हाण यांनी प्रत्येकी दोन महिन्याचे खोली भाडे देण्याचे जाहीर केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते पोपट नाईक यांनी पंधरा दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली आहे.

दरम्यान, मुलगा अमोल कानडे हा एमआयडीसी येथे ऑपरेटर म्हणून काम करत होता पण लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आहे. आजारपण सुरू असल्याने तो आईच्या सेवेला राहत असल्याने उघड्यावर चूल मांडून असेल नसेल त्या परिस्थितीत जीवन जगावे लागत असल्याने त्यांना मदतीची गरज आहे.

गावकामगार तलाठी,ग्रामसेवक यांना झालेल्या नुकसानीबद्दल कल्पना दिली आहे. सोमवारी पंचनामा करण्यात येणार आहे. काही समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी कानडे कुटुंबीयांना जीवनावश्यक व रोख स्वरूपात मदत करून सहकार्य करावे असे आवाहन करत आहे.

सुवर्णा माने

सरपंच, ग्रा. पं. उजळाईवाडी

फोटो ओळ: उजळाईवाडी शाहू नाक्याशेजारी असलेल्या मंगल कानडे यांच्या घराची पाहणी करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व मदतकार्य.

Web Title: The Gram Panchayat will provide support to the dilapidated house of Mangal Kanade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.