ग्रामपंचायतींचा आखाडा रंगणार

By admin | Published: March 20, 2017 12:52 AM2017-03-20T00:52:31+5:302017-03-20T00:52:31+5:30

आॅक्टोबरपासून होणार निवडणुका ४७९ गावे; राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला

Gram Panchayats' Akhada will be played | ग्रामपंचायतींचा आखाडा रंगणार

ग्रामपंचायतींचा आखाडा रंगणार

Next

कोल्हापूर : नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणधुमाळीनंतर आता आॅक्टोबरपासून ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी उडणार आहे. यात जिल्ह्यातील तब्बल ४७९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आतापर्यंत गटातटात कमालीच्या चुरशीने होणाऱ्या या निवडणुकांमध्ये यावेळी थेट पक्षाचा सहभाग असणार आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आणण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच चाचपणी सुरू केली असून, भाजपने रविवारी याबाबत आढावा बैठकही घेतली.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणीच दिसणाऱ्या भाजपचे नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष झाले; तर जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांतही भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गावपातळीवर सत्ता ताब्यात राहावी, यासाठीही निवडणुका जाहीर होण्याआधीच सहा महिने भाजपने तयारी सुरू ठेवली आहे. ग्रामपंचायतीला थेट निधी देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तेथील सत्ता महत्त्वाची असल्याचे ओळखले आहे. याआधीही पक्षाला याची जाणीव होती; परंतु त्यासाठी सत्तेचे जे पाठबळ लागते ते नव्हते. शिवसेना भाजपपेक्षाही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुजल्याने अनेक ठिकाणी शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच, सदस्य दिसून येतात. ही उणीव भरून काढण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे.
भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी रविवारी बारा तालुकाध्यक्षांची बैठक घेतली. यामध्ये जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होणार आहे, याची त्यांना माहिती देण्यात आली. तेथील सध्याची राजकीय स्थिती, बलाबल, संभाव्य शक्यता यांची माहिती घेऊन पुन्हा
पुढील आठवड्यात या तालुकाध्यक्षांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी गाववार कसे मतदान झाले याची आकडेवारीही यावेळी संकलित करण्यात आली. ही माहिती घेऊन प्रत्येक तालुकानिहाय तेथील पदाधिकाऱ्यांसह बैठक घेऊन, मित्रपक्षांशी चर्चा करून अधिकाधिक ग्रामपंचायती लढविण्याचे नियोजन भाजपने केले आहे.


डिसेंबर २०१७ अखेर निवडणूक लागणाऱ्या ग्रामपंचायती
तालुकाग्रा. पंचायत सदस्य
संख्यासंख्या
कागल२६२४०
हातकणंगले४१५४९
चंदगड४१३२१
भुदरगड४४३२८
शिरोळ१७१९३
करवीर५३५८७
गगनबावडा२११५५
राधानगरी६६५६६
गडहिंग्लज३४३००
आजरा३७३०९
पन्हाळा५०४२६
शाहूवाडी४९४०३
एकूण४७९४४०७


महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती होत आहेत. त्यामुळे गावागावांत पक्ष रुजविण्याची हीच संधी आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणुका लढविणे, जिंकणे आणि सत्तेच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या कल्पना राबविणे यासाठी भाजपची तयारी चालू आहे.
- बाबा देसाई, संघटनमंत्री, भाजप

Web Title: Gram Panchayats' Akhada will be played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.