राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायतींचे धुमशान--राजकीय मोर्चेबांधणी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:53 PM2017-09-22T23:53:06+5:302017-09-22T23:54:52+5:30

राधानगरी : राधानगरी तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीची राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे.

Gram Panchayats' Dhumashan in Radhanagari Taluka - Political Frontline Strong | राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायतींचे धुमशान--राजकीय मोर्चेबांधणी जोरात

राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायतींचे धुमशान--राजकीय मोर्चेबांधणी जोरात

Next
ठळक मुद्देथेट सरपंच निवडणुकीमुळे समीकरणे बदलणारउमेदवारांना अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे अगोदर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

संजय पारकर । -लोकमत न्यूज नेटवर्क
राधानगरी : राधानगरी तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीची राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. सरपंचपदासाठी प्रथमच थेट निवडणूक होणार असल्याने मोठी उत्सुकता असून बरीच समीकरणे बदलणार आहेत. निवडणूक आयोगाकडून यावेळी निवडणूक पद्धतीत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. त्याला सामोरे जाताना इच्छुकांची तारांबळ उडणार आहे. निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया होणार असल्याने यातच उमेदवारांची अर्धी शक्ती खर्च होणार आहे.

तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी नुकतीच कार्यकर्ते व ई-सेवा देणाºया केंद्र चालकांची कार्यशाळा घेतली. यावेळी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे अगोदर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यात मालमत्ता विवरणपत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे व अपत्याबाबतचे प्रतिज्ञापत्र भरावे लागणार आहे. या अर्जाची छापील प्रत काढून त्यावर आवश्यक तेथे सह्या, सोबत ग्रामपंचायतीची बाकी नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे व शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

निवडणुकीसाठी मर्यादा घालून दिलेला खर्च बँकेतूनच करावा लागणार असल्याने राष्ट्रीयीकृत किंवा जिल्हा बँकेत नव्याने सुरु केलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची प्रत जोडावी लागणार आहे. सोबत २१ वर्षे पूर्ण असलेला वयाचा पुरावा, अनामत रकमेची पावती, सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीने किमान सातवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा जोडावा लागणार आहे. राखीव जागेवर निवडणूक लढविणाºयांनी जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. ते नसल्यास जिल्हा पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याची पोहोच व ते सहा महिन्यात दाखल करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

आँनलाईन अर्ज ई-सेवा केंद्रात २४ तास केव्हाही भरता येईल मात्र त्याची प्रत व वरील सर्व कागदपत्रे मुदतीत दुपारी साडेचार पर्यंत निवडणूक अधिकाºयाकडे जमा करावी लागणार आहेत.

खर्चाचा तपशील दररोज द्यावा लागणार
मागीलवेळी जात वैधता प्रस्ताव तहसील कार्यालयात स्वीकारून पोहोच दिली होती. मात्र आता फक्त अर्ज भरणार असल्याचे शिफारसपत्र दिले जाईल. उमेदवारांना परस्पर जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल करून पोहोच घेण्यासाठी या कार्यालयात जावे लागणार आहे. मागील वेळी शेवटच्या दोन दिवसांत आँनलाईन अर्ज दाखल करण्यात अडचणी आल्याने हस्तलिखित अर्ज घेतले होते. यावेळी मात्र असे होणार नाही. होणाºया खर्चाचा तपशील रोजच्या रोज द्यावा लागणार आहे.

Web Title: Gram Panchayats' Dhumashan in Radhanagari Taluka - Political Frontline Strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.