जिल्ह्यातील ८८० ग्रामपंचायतींच्या आज ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:10+5:302021-08-15T04:25:10+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७९२ कोरोनामुक्त गावे व पाचपेक्षा कमी रुग्ण असलेल्या ८८ अशा एकूण ८८० गावांमध्ये आज स्वातंत्र्यदिनी ...

Gram Sabha of 880 Gram Panchayats in the district today | जिल्ह्यातील ८८० ग्रामपंचायतींच्या आज ग्रामसभा

जिल्ह्यातील ८८० ग्रामपंचायतींच्या आज ग्रामसभा

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७९२ कोरोनामुक्त गावे व पाचपेक्षा कमी रुग्ण असलेल्या ८८ अशा एकूण ८८० गावांमध्ये आज स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा घेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तर ५ पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या १० तालुक्यांतील १४५ गावांमध्ये ग्रामसभा घेता येणार नाही.

सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १.७५ टक्के असून, १०२५ पैकी ७९२ गावे कोरोनामुक्त आहेत. ८८ गावांत ५ पेक्षा कमी रुग्ण आहेत. या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांना नियम व अटी घालून परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एकाच रजिस्टरवर सह्या न घेता प्रत्येकाला स्वतंत्र पान देण्यात यावे, मोठ्या पटांगणात ग्रामसभा घ्यावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सक्रिय रुग्ण कमी आहे अशा प्रतिबंधित क्षेत्रातील व घरातील व्यक्तींना तसेच ५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावातील नागरिकांना ग्रामसभेला उपस्थित राहता येणार नाही. सभेच्या ठिकाणी, शारीरिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर अशा नियमांचे पालन केले जावे अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

----

तालुका : ५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावांची संख्या

करवीर : ३३

शिरोळ : २७

हातकणंगले : २१

गडहिंग्लज : १८

पन्हाळा : १७

कागल : १०

शाहूवाडी : ७

चंदगड : ५

राधानगरी : ५

आजरा : २

-------------

Web Title: Gram Sabha of 880 Gram Panchayats in the district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.