सकल मराठा समाजाचा एल्गार सुरूच बेमुदत ठिय्या आंदोलन : धनंजय महाडिक, मिणचेकरांसह विविध संघटनांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:58 AM2018-07-29T00:58:31+5:302018-07-29T00:59:08+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू राहिला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह

Grameen movement by gross Maratha community of Elgar: Dhananjay Mahadik, Minakeskar and many organizations supported | सकल मराठा समाजाचा एल्गार सुरूच बेमुदत ठिय्या आंदोलन : धनंजय महाडिक, मिणचेकरांसह विविध संघटनांचा पाठिंबा

सकल मराठा समाजाचा एल्गार सुरूच बेमुदत ठिय्या आंदोलन : धनंजय महाडिक, मिणचेकरांसह विविध संघटनांचा पाठिंबा

Next

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू राहिला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह विविध संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

जिल्ह्याच्या विविध भागांतून रॅलीद्वारे मराठा बांधवांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते घोषणा देत आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत होते. ‘एक मराठा...लाख मराठा...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दिवसभरात आंदोलनस्थळी खासदार धनंजय महाडिक यांनी ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांसमवेत भेट देऊन पाठिंबा दिला. याचबरोबर आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, एस. आर. पाटील, देवानंद कांबळे, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह चिखली ग्रामस्थ, दैवज्ञ समाज, कोल्हापूर मंडप डेकोरेटर्स असोसिएशन, आश्रय अपंग व सामाजिक बहुउद्देशीय संस्था (सादळे), सर्व जातिधर्म वधूवर सूचक संस्था, कोल्हापूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघ, महाराष्टÑ रिक्षाचालक सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खाटीक समाज, राजर्षी शाहू लघु उद्योजक असोसिएशनने पाठिंबा दिला.

आंदोलनात इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, सचिन तोडकर, शाहीर दिलीप सावंत, वसंतराव मुळीक, फत्तेसिंह सावंत, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, प्रा. जयंत पाटील, राजू लिंग्रस, हर्षल सुर्वे, प्रसाद जाधव, जयदीप शेळके, किशोर घाटगे, संदीप पाटील, उमेश पोवार, उदय लाड, स्वप्निल पार्टे, जयकुमार शिंदे, आदी सहभागी झाले होते.


कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा पाठिंबा
आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेसह सर्वाेदय मंडळ, जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाच्या बैठकीत पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुंदर देसाई, प्राचार्य व्ही. डी. माने, भीमराव पवार, प्रा. डी. डी. चौगले, प्रा. आशा कुकडे, सविता देसाई, पी. के. पाटील, आदी उपस्थित होते.

निपाणीच्या मराठा समाजाचा पाठिंबा
निपाणी (जि. बेळगाव) येथील सकल मराठा समाजातर्फे कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या समर्थनार्थ निपाणी बंद करून भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर दसरा चौकातील आंदोलनस्थळी येऊन सकल मराठा समाजकल्याण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मराठा समाजाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र दिले.

महिलांची रॅली आज
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील महिलांच्या वतीने आज, रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे.

संभाजीराजे आज आंदोलनस्थळी
संसदेत भूमिका मांडल्यानंतर खासदार संभाजीराजे आज, रविवारी कोल्हापुरात येत असून सकाळी ११ वाजता ते आंदोलस्थळी भेट देणार आहेत.

Web Title: Grameen movement by gross Maratha community of Elgar: Dhananjay Mahadik, Minakeskar and many organizations supported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.