बांधकाम कामगारांंच्या स्वयंघोषणा पत्रावर ग्रामसेवकांनी स्वाक्षरी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:37+5:302021-02-24T04:25:37+5:30
चंदगड तालुक्यातील बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांची महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याककडे नोंदणी ...
चंदगड तालुक्यातील बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांची महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याककडे नोंदणी सुरू आहे.
तथापि, या नोंदणीसाठी ग्रामसेवकांची स्वाक्षरी व शिक्का ग्राह्य मानला जात आहे. मात्र, काही गावांतील ग्रामसेवक या कामगारांना त्यांच्या स्वयंघोषणा पत्रावर स्वाक्षरी व शिक्का देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक कामगारांची नोंदणी खोळंबली आहे व त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यापासून मुकावे लागत आहे.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना स्वाक्षरी व शिक्का देण्यास कळवावे, असे निवेदन गटविकास अधिकारी यांना चंदगड तालुका बांधकाम संघटनेतर्फे देण्यात आले आहे.
निवेदनावर अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे, उपाध्यक्ष बाबू चौगुले, सचिव मोहन चौगुले, खजिनदार उमाजी पवार, सदस्य मारुती कांबळे, अवधूत भुजबळ, शिवाजी पाटील, सटुप्पा सुतार, तानाजी पाटील, मारुती पाथरूट, शिवाजी सुतार, सट्टुप्पा कांबळे, राजाराम राजगोळकर, विलास कांबळे, रघुनाथ पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.