स्वामी समर्थ इच्छापूर्ती महापदयात्रेला प्रारंभ, भव्य मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 02:35 PM2019-12-02T14:35:14+5:302019-12-02T14:37:14+5:30

कोल्हापूर ते अक्कलकोट अशी ‘स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रे’ला रविवारी पंचगंगा नदीघाट येथून भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The grand procession begins, a grand procession for Swami Samarth Desh | स्वामी समर्थ इच्छापूर्ती महापदयात्रेला प्रारंभ, भव्य मिरवणूक

कोल्हापूर ते अक्कलकोट स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेला रविवारी कोल्हापुरातून सुरुवात झाली. यावेळी स्वामी समर्थ यांच्या सजविलेल्या भव्य रथासह भक्तिपूर्ण वातावरणात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

Next
ठळक मुद्देस्वामी समर्थ इच्छापूर्ती महापदयात्रेला प्रारंभ, भव्य मिरवणूक२५0 पेक्षा जास्त भाविकांचा सहभाग : कोल्हापूर ते अक्कलकोट पदयात्रा

कोल्हापूर : कोल्हापूर ते अक्कलकोट अशी ‘स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रे’ला रविवारी पंचगंगा नदीघाट येथून भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महासुखाचा हा पायी सोहळा मार्गशीर्ष व दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूर ते अक्कलकोट अशी पदयात्रा काढून केला जातो. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. रविवारी भव्य मिरवणुकीने पदयात्रेला सुरुवात झाली. दोनशेपेक्षा जास्त महिला, पुरुष, युवक-युवती असे भाविक सहभागी झाले होते.

यावेळी स्वामी समर्थ यांचा सजविलेला भव्य रथ, ढोल-ताशा, उंट, घोडे, पारंपरिक वाद्यांचा गजर मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यावेळी अभिनेत्री प्रांजल पालकर, ऐश्वर्या पालकर, अमोल कोरगांवकर, हाजी अब्दुलहमीद मिरशिकारी, परेश भोसले यांची उपस्थिती होती. सुहास पाटील, अमोल कोरे, रमेश चावरे, जगमोहन भुर्के, प्रमोद खाडे यांनी संयोजन केले.

शिवाजी चौकात महाआरती

पंचगंगा घाट येथून पदयात्रा गंगावेश, रंकाळा स्टँड, ताराबाई रोड, अंबाबाई मंदिर, पापाची तिकटीमार्गे शिवाजी चौक येथे आल्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदयात्रा ११ डिसेंबरला अक्कलकोटमध्ये पोहोचणार

महाआरती झाल्यानंतर पदयात्रा महाराणा प्रताप चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे मार्केट यार्ड येथील विठ्ठल मंदिरात आली. यावेळी मुक्काम करण्यात आला. सोमवारी सकाळी मार्केट यार्ड येथून पदयात्रा हातकणंगले बस स्टँडमार्गे जयसिंगपूर येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये मुक्कामकरणार आहे. यानंतर मिरज, कवठेमहांकाळ, वाटेगाव, मंगळवेढा, सोलापूरमार्गे ११ डिसेंबर रोजी अक्कलकोट येथे पोहोचणार आहे.

 

 

Web Title: The grand procession begins, a grand procession for Swami Samarth Desh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.