राजर्षी शाहू मराठा महोत्सवाला शानदार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 04:54 PM2019-01-24T16:54:02+5:302019-01-24T17:46:57+5:30
महोत्सवाचा उत्सव होऊ नये व त्यातून तरुण महिला व शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोल्हापूरात भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवातून गुरुवारी प्रबोधन झाले. शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, मुलींच्या लेझीम अन झांज पथकांचा दणदणाट, प्रबोधनपर व्याख्याने, ग्रंथ, व्यवसायवृध्दीपर विविध स्टॉल्स अशा विविध उपक्रमांनी चार दिवसीय महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. राज्यातील हा पहिलाच प्रबोधन महोत्सव असल्याने दिवसरभर या ठिकाणी गर्दी झाली होती.
कोल्हापूर : महोत्सवाचा उत्सव होऊ नये व त्यातून तरुण महिला व शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोल्हापूरात भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवातून गुरुवारी प्रबोधन झाले. शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, मुलींच्या लेझीम अन झांज पथकांचा दणदणाट, प्रबोधनपर व्याख्याने, ग्रंथ, व्यवसायवृध्दीपर विविध स्टॉल्स अशा विविध उपक्रमांनी चार दिवसीय महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. राज्यातील हा पहिलाच प्रबोधन महोत्सव असल्याने दिवसरभर या ठिकाणी गर्दी झाली होती.
दसरा चौकात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन वीरमाता संयोगिता शिंदे, लक्ष्मी जाधव, मनिषा मदनराव सुर्यवंशी, छाया भोसले, आनंदी उलपे व वीर पत्नी कांचनदेवी चव्हाण यांच्या हस्ते फित कापून झाले. प्रमुख उपस्थिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची होती.
महोत्सवासाठी भव्य मंडप उभारण्यात आले असून त्याच्या प्रवेशद्वाराला रायगडच्या नगारखान्याची प्रतिकृती करण्यात आली असून त्याचे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज असे ठेवण्यात आले आहे.
प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांची २० फुटी अश्वारुढ पुतळा ठेवण्यात आला आहे. त्याचे पुजन उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती उद्योगपती संग्राम पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, डॉ. भरत कोटकर, अॅड. धनंजय पठाडे, वसंतराव देशमुख, आदींची होती.