दादा, ‘उत्तर’पेक्षा,‘पदवीधर’चे बघा

By admin | Published: October 11, 2015 11:36 PM2015-10-11T23:36:50+5:302015-10-12T00:26:59+5:30

राजेश क्षीरसागर यांचा पलटवार : चिन्ह नसलेल्यांशी आघाडीची ‘भाजप’वर वेळ

Grandfather, look 'Graduate', than 'Answer' | दादा, ‘उत्तर’पेक्षा,‘पदवीधर’चे बघा

दादा, ‘उत्तर’पेक्षा,‘पदवीधर’चे बघा

Next

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘उत्तर विधानसभा मतदारसंघ’ टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची पहिल्यांदा जास्त काळजी करावी. कारण गेल्या निवडणुकीत निवडून येताना ते घामाघूम झाले होते. आणि विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनाही त्यांच्या विरोधात उतरणार आहे. त्यामुळे दादांनी आपल्या आमदारकीचे बघावे, असा पलटवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. चिन्ह नसलेल्या आघाडीशी युती करण्याची केविलवाणी वेळ भाजपवर आल्याची टीका करीत शिवसेना स्वाभिमानाने सर्वच्या सर्व ८१ जागा लढवीत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढण्याचे टार्गेट नाही; पण ‘उत्तर’ टार्गेट असल्याची टीका मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना आमदार क्षीरसागर म्हणाले, भाजप थेट विरोधात असताना आपल्या मताधिक्यात पाचपटींनी वाढ झाली. याउलट गतनिवडणुकीत चंद्रकांतदादा मात्र अवघ्या २३०० मतांनी कसेबसे विजयी झाले. मागील सहा विधानसभा निवडणुकांपैकी पाचवेळा कोल्हापूरची जनता शिवसेनेच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे दादांचे ‘उत्तर’ जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील.’
शिवसेनेने पत्रकबाजी केल्याने महापालिकेसाठी युती केली नसल्याचा आरोप मंत्री पाटील करीत आहेत; पण वस्तुस्थिती तशी नाही. भाजपने ‘प्रिप्लॅनिंग’ करून युती तोडली आहे. ती तोडायची होती म्हणूनच त्यांनी कोल्हापुरात पक्षाचे अधिवेशन घेतले? त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ‘ताकद’ दाखविण्याची भाषा वापरली. सुरुवात त्यांनी केल्याने आम्ही ‘भगव्या सप्ताहा’ने त्यास उत्तर दिले. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची खरी जागा दाखवेल, असा इशाराही आमदार क्षीरसागर यांनी दिला. शिवसेनेतील काही चौकडी निष्ठावंत असल्याचे सांगत पक्षाला बदनाम करीत आहे; पण उमेदवारी देताना पक्षनिष्ठा पाहूनच उमेदवारी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Grandfather, look 'Graduate', than 'Answer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.