आजी-माजी जिल्हाधिकाऱ्यांवरकारवाईची मागणी
By admin | Published: October 22, 2015 12:47 AM2015-10-22T00:47:10+5:302015-10-22T00:49:25+5:30
‘डीडी’ गहाळप्रकरण
कोल्हापूर : मस्कत येथे नितीश पाटील यांच्या अपघाती मृत्यूनंतर भरपाईचा २३ लाखांचा ‘डीडी’ वारसांना देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विलंब होऊन अखेर तो गहाळ झाला. याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार सुनीता नेर्लीकर, अव्वल कारकून विद्या गवारी, लिपिक सुप्रिया शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्तीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, महसूलमंत्री व विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यामुळे प्रशासकीय प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. त्याचबरोबर त्यांच्या पगारातून ही रक्कम मिळेपर्यंत होणाऱ्या कालावधीचे व्याज वसूल करावे. तसेच ही रक्कम संबंधित वारसदारांना तातडीने उपलब्ध करून द्यावी; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष बिसुरे यांनी दिला आहे. जिल्हाध्यक्ष उमेश खांडेकर, शहराध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या सह्या आहेत.